spot_img
अहमदनगरपारनेरच्या जनतेला २०१९ मध्ये केलेली चूक सुधारण्याची संधी? खासदार विखेंनी 'त्या' वक्तव्यावर...

पारनेरच्या जनतेला २०१९ मध्ये केलेली चूक सुधारण्याची संधी? खासदार विखेंनी ‘त्या’ वक्तव्यावर घेतला पवारांचा समाचार

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री 
पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी नेत्यांना पाच तास लागतील असा टोला महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला. लोकसभेची ही निवडणूक देशाचे उज्वल भवितव्य घडवणारी असल्याने नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान होतील आणि अहिल्यानगरचा खासदारही महायुतीचा असेल असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला.

तालूक्यातील भाळवणी येथे महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, काशिनाथ दाते, प्रा. विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

खा. डॉ. विखे म्हणाले की, या निवडणुकीत निम्मे काम जेष्ठ नेत्यांनी करून टाकले आहे. आता उरलेले निम्मे काम १३ मे रोजी मतदार संघातील जनता करेल. शरद पवारांच्या पक्षाला उमेदवार आयात करावा लागला. हा उमेदवार कसा आहे? हे पारनेरच्या जनतेला चांगले माहित आहे. पण पारनेरच्या जनतेला २०१९ मध्ये केलेली चूक सुधारण्याची संधी आहे. या मतदार संघातील युवकांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याची माझी जबाबदारी आहे. मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोगा मतदारांपुढे आहे. जे केले तेच आपण सांगतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची पार्श्वभूमी मांडून केवळ गुंडगीरी आणि दहशत निर्माण करण्याचे तंत्र तालुक्यात अवलंबवले गेले. पण आता सर्वच गोष्टींची पोलखोल झाली आहे. तालुक्यात घडलेल्या अनेक गोष्टीची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली.

राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर यांनी विकासाच्या मुद्यावर अजितदादा पवार यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय  घेतला. अहिल्यानगरचा विकास करण्यासाठी महायुतीचा खासदार निवडून जाणे हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
Sent from my iPhone

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...