spot_img
अहमदनगर१० वर्षांत पंतप्रधान मोदी यांचे कृषी विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण निर्णय: खासदार विखे पाटील

१० वर्षांत पंतप्रधान मोदी यांचे कृषी विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण निर्णय: खासदार विखे पाटील

spot_img

अहमदनगर । नगर सह्याद्री
मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या महत्वपुर्ण निर्णयाचा लाभ शेतकर्‍यांना झाला आहे. पारंपारिक शेतीला प्राधान्य देऊन केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील आधुनिक शेतीचा मार्ग सुखकर केला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

चिचोंडी पाटील येथील महायुतीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, भाजप. ता. अध्यक्ष अशोक कार्ले, राष्टवादीचे ता. अध्यक्ष अशोक कोकाटे, मार्केट समितीचे माजी संचालक हरिभाऊ कर्डीले, शिवसेना ता. अध्यक्ष अजित दळवी, युवा सेना अध्यक्ष सचिन ठोंबरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना सक्षम बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेसह शेती क्षेत्रातील परिवर्तनाला गती देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे, त्यांना आणि त्यांचे प्रयत्न सुरक्षित करणे, त्यांना तंत्रज्ञानाचे जाणकार बनवणे, कृषी संशोधन आणि शिक्षणाला चालना देणे आणि शेतीशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काही प्रमुख उद्दिष्टे आहेत. कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आणि शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी काम केले जात असे त्यांनी खा. डॉ. विखे यांनी सांगितले.

खा. विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलेला न्यू इंडिया हा त्यांच्या सबका साथ, सबका विकास या ब्रीद वायावर चालतो, आणि शेतकरी कल्याण हा त्याचा अविभाज्य भाग आहे. कोणत्याही परिवर्तनाचा प्रारंभिक जोर हा जागरूकतेतून येतो. आणि ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या संदर्भात, लॅब-टू-लँड, हर खेत को पानी आणि पर ड्रॉप मोअर क्रॉप यांसारख्या संदेशांच्या सरकारच्या प्रेरणादायी योजनांनी शेतीची उत्पादकता वाढली आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय सरकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

हे काम जलद गतीने होत आहे. आपल्यासारख्या राष्ट्राची, जिथे जवळपास निम्मी कामगार शक्ती शेतीमध्ये गुंतलेली आहे, शेती शाश्वत केल्याशिवाय भरभराट होऊ शकत नाही. यामुळे तंत्रज्ञानापासून पीक विम्यापर्यंत, सुलभ कर्ज उपलब्धतेपासून ते आधुनिक सिंचन पद्धतींपर्यंत, संपूर्ण शेती चक्रामध्ये शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी सर्वसमावेशक कृती योजना राबवून पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना सक्षम करण्याचे काम सुरू केले आहे. श्री अन्नाच्या माध्यमातून देशातील तृणधान्य जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचविण्यांचा त्यांचा निर्णय महत्वपुर्ण ठरला. असे डॉ. खा. विखे यांनी सांगितले.

महायुती सरकारमार्फत विकसित भारताचे स्वप्न साकार होणार ः कर्डिले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली समाजातील सर्व घटकांचा विकास होत आहे. येणार्‍या काळात महायुतीचे सरकार मार्फत विकसित भारताचे स्वप्न साकार होणार आहे. यामुळे पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा खासदार बनविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाला निवडुण आणण्याची जबाबदारी आपली आहे. आणि ही जबाबदारी प्रत्येक कार्यकर्ता काटेकोरपणे पार पाडील असा विश्वास जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...