spot_img
राजकारणकशाची वाट बघतंय? 'अहंकाराची गोळी खाणाऱ्या सरकारला सैरावैरा..' रोहीत पवारांनी साधला सरकारवर...

कशाची वाट बघतंय? ‘अहंकाराची गोळी खाणाऱ्या सरकारला सैरावैरा..’ रोहीत पवारांनी साधला सरकारवर निशाणा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री –

मराठा आरक्षणाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर पडू लागले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वसामन्य जनता रस्त्यावर उतरली आहे.आरक्षणाबाबत सरकारने मौन धारण केल्यामुळे रोष व्यक्त होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाज आक्रम आलेला पहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ संपूर्ण राज्यभरात सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरू आहे.

आरक्षणाबाबत सरकार ची चाललेली चालढकल व राजकीय नेत्यांनी धारण केलेले मौन यामुळे समाजामध्ये अस्वस्थता, वाढत असून त्यांच्याबद्दल रोष व्यक्त होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवरआमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे.

समाजासाठी प्रामाणिकपणे लढणारा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत क्षणाक्षणाला खालावत चालल्याने त्यांची सर्वांनाच चिंता वाटतेय. अशा परिस्थितीत सरकार नेमकी कशाची वाट बघतंय?

सरकारला थोडीजरी काळजी असेल तर त्वरीत निर्णय घ्या आणि जरांगे पाटील यांची काळजी घ्या अन्यथा खोटेपणाची आणि अहंकाराची गोळी खाऊन आपल्याच धुंदीत असलेल्या सरकारला जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळण्याची वेळ येईल. असे त्यानी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...