spot_img
अहमदनगरआरक्षण; पुढार्‍यांना गावागावात नो एंट्री, नगरमध्ये घडल्या अशा घटना...

आरक्षण; पुढार्‍यांना गावागावात नो एंट्री, नगरमध्ये घडल्या अशा घटना…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री- मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गावोगावी सरकार व विविध राजकीय नेत्यांच्या विरोधात रोष तयार होऊ लागला आहे. तालुयातील अनेक गावांनी खासदार, आमदारांसह नेत्यांना गावात प्रवेश बंदी असलेले जाहीर फलक लावून त्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. गावच्या प्रवेशद्वारातच राजकीय नेत्यांना नो एन्ट्री चे फलक लागले आहेत.

मराठा आरक्षणासाठी आंतरवली येथून आंदोलनास सुरूवात करणारे मनोज जरांगे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी केली आहे. त्यासंदर्भात राज्य भर जरांगे यांनी जाहीर सभांच्या माध्यमातून रान पेटवले आहे. याच पार्श्वभूमीवर गावागावांतील मराठा समाज जरांगे यांच्या पाठीशी एकवटला आहे. आरक्षणाबाबत सरकार ची चाललेली चालढकल व राजकीय नेत्यांनी धारण केलेले मौन यामुळे समाजामध्ये अस्वस्थता, वाढत असून त्यांच्याबद्दल रोष व्यक्त होऊ लागला आहे.

नगर तालुयातील मांडवे या गावाने सर्व आजी, माजी खासदार, आमदारांसह राजकीय नेत्यांना गावात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही. यांनी आपली मानमर्यांदा राखूनच गावात प्रवेश करावा. अशा इशारा देणारा फलक गावाच्या प्रवेशद्वारावच लावला आहे.

त्याखाली कोणत्याही गावातील कार्यकर्त्यांच्या नावाचा उल्लेख न करता सकल मराठा व ग्रामस्थ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यातून तालुयातील अनेक गावांचा आरक्षणा संदर्भात राजकीय नेत्यांबद्दलचा रोष व्यक्त होऊ लागला आहे. नगर तालुक्यात आत्तापर्यंत तब्बल ४० पेक्षा जास्त गावांमध्ये पुढार्‍यांना गावबंदी केली आहे.

सांडव्यात पुढार्‍यांना बंदी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरनगर तालुक्यातील सांडवे येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच प्रविण तात्याराम खांदवे यांनी दिली. आरक्षणाबाबत सरकार ची चाललेली चालढकल व राजकीय नेत्यांनी धारण केलेले मौन यामुळे समाजामध्ये अस्वस्थता, वाढत असून त्यांच्याबद्दल रोष व्यक्त होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील सांडवे ग्रामपंच्यातच्या ग्रामसभेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा तसेच आजी, माजी खासदार, आमदारांसह राजकीय नेत्यांना गावात प्रवेश करण्यास बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. गावाच्या दर्शनी भागावर जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही. तहसीलदार यांना दिलेल्या ठरावावर सरपंच प्रविण खांदवे, उपसरपंच, ग्रामपंच्यात सदस्य परशुराम घोलप, मंगल निक्रड, चंद्रकला करांडे, निलोफर शेख, प्राजक्ता खांदवे यांच्या सह्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...