spot_img
राजकारणकेंद्राने देवेंद्र फडणवीसांचा ‘अडवाणी’ केला...मोठा गौप्यस्फोट

केंद्राने देवेंद्र फडणवीसांचा ‘अडवाणी’ केला…मोठा गौप्यस्फोट

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री –
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण बदललेले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे सगळ्यांनाच वाटले. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

भाजपचे १०५ आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर बोलताना काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी मोठी टिप्पणी केली आहे. केंद्रातील भाजपाच्या मदाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचा ‘अडवाणी’ केल्याची टीका कन्हैया कुमार यांनी केली.

दरम्यान, त्यांनी अमृता फडणवीसांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आजकाल देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नीच्या गाण्यांचे व्हिडिओ जास्त पाहायला मिळतात. मला फडणवीसांची दया येते, असे कन्हैया कुमार म्हणाले. देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन,’असं म्हणत होते. पण केंद्रातल्या त्यांच्या मदाऱ्यांनी त्यांचा पार ‘अडवाणी’ केला आहे.

१०५ आमदार असूनही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवून स्वत: त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करावं लागत आहे असे ते म्हणाले. कन्हैय्या यांनी मुंबईने आपल्याला किती भरभरून दिलं आहे, याची आठवण सांगितली. आपल्या मुंबई दौऱ्यात विविध कार्यक्रमांना पोलिसांकडून आडकाठी केली जात आहे. त्यात पोलिसांचा दोष नाही. ठरावीक नेत्यांचे तळवे चाटणं, म्हणजे देशसेवा अशी धारणा आजकाल झाली आहे. पण या नेत्यांचे पगार, भत्ते लोकांनी भरलेल्या करातून निघतात. त्यामुळे हे लोक सामान्य जनतेला उत्तरदायी आहेत,

हे त्यांना विसरून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसमध्ये आल्यापासून भाजपचं आमच्यावरचं प्रेम खूप वाढलं आहे. पण ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नची फिरकी खेळण्याची सवय झाली होती, त्याचप्रमाणे मलाही जय शाह यांच्या वडिलांची गुगली खेळता येते, असा टोलाही त्यांनी हाणला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पत्र आले आमदारांचे, ‘माफी’ सूचली प्रशासनाला

शास्तीच्या रकमेत सवलत देण्याची परंपरा कायम ः आता प्रतिसादाकडे लक्ष अहमदनगर | नगर सह्याद्री आमदारांनी पत्र...

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...

Ahmednagar: सैनिकाला मारहाण..; नगरच्या ‘या’ भागात ‘धक्कादायक’ प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री- सैनिकाच्या पत्नी विषयी समाजात वाईट बोलून त्यांची बदनामी केली. याबाबत जाब...

‘महसूलमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातुन तीन कोटी निधी’

सागर मैड यांची पत्रकार परिषदेत माहिती सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा गावात येत्या काळात...