पारनेर | नगर सह्याद्री-
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेची अंतिम मतदार यादी मंगळवारी दि २६ डिसेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक यांनी जाहीर केली आहे. त्या यादीनुसार बँकेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह आता ५१६१ सभासद मतदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून फेब्रुवारी मध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे निवडणुकीसाठीचा मतदार यादी प्रसिध्दीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार मंगळवारी अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या पूर्वी २९ मे रोजी मतदार यादी प्रसिध्द झालेली होती. त्या वेळी ४ हजार ७९४ सभासद पात्र ठरले होते. ६ हजार ९९ सभासद अपात्र ठरले होते. त्या सभासदांना अपात्र होण्याची कारणे देखील बँकेने लेखी स्वरूपात कळविली होती.
त्यात अनेक सभासदांचे शेअर्स रक्कम कमी असल्याने ते सभासद अपात्र ठरले होते. त्यांना नोटिसा पाठविल्यानंतर काही सभासदांनी आपले शेअर्श रक्कम पूर्ण केल्याने आता सहा हजार १६१ सभासद मतदानास पात्र ठरले आहेत. त्या सभासदांचे अपूर्ण शेअर्स रकमेचा भरणा करून बँकेच्या निवडणुकीचे मतदानासाठी पात्र झालेले आहेत. अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी प्रारूप यादीवर १८ डिसेंबर अखेर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज अखेर (ता. २६) सुनावणी होऊन मंगळवारी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.