spot_img
अहमदनगरAhmednaga: अर्बन बँक घोटाळा!! 'या' अधिकार्‍यांना अटक, पहा..

Ahmednaga: अर्बन बँक घोटाळा!! ‘या’ अधिकार्‍यांना अटक, पहा..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
येथील नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक व दीडशे कोटींच्या घोटाळ्यात बँकेच्या दोन अधिकार्‍यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली आहे. शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया (रा. नगर) व शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील (रा. नगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर रात्री उशिरा अटक करण्यात आली.

बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार नगर अर्बन बँकेच्या कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले आहे.

त्याचा अहवालही आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर झाला आहे. यात दोषी संचालक, कर्जदार व अधिकार्‍यांची यादी तयार केली आहे. तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी काही अधिकारी व कर्मचार्‍यांना बुधवारी चौकशीस बोलावले होते. चौकशीनंतर लुनिया व पाटील यांना अटक करण्यात आली. कर्ज मंजुरी प्रकरणात त्यांच्यावर ठपका असल्याचे उपअधीक्षक खेडकर यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...