spot_img
अहमदनगरAhmednaga: मोठे योगदान!! 'खासदार विखे यांच्या माध्यमातून विकास'

Ahmednaga: मोठे योगदान!! ‘खासदार विखे यांच्या माध्यमातून विकास’

spot_img

निघोज। नगर सहयाद्री-
खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी गेली पाच वर्षात खासदारकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावीत मोठ्या प्रमाणात योगदान दिले असून निघोज -अळकुटी जिल्हा परिषद गटात सचिन वराळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केले आहे.

पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथील म्हसे खुर्द-जाधव वस्ती-गुणोरे या रस्त्याचे डांबरीकरण कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी संदिप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील वराळ, सरपंच निलम उदमले, उपसरपंच नंदराज खोमणे, माजी उपसरपंच मार्तंड जाधव, ग्रा. सदस्या रखमाबाई येळकर, माजी चेअरमन दिलीप मदगे, चेअरमन संभाजी मदगे, अल्पसंख्या समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार,आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरडे यावेळी म्हणाले, गेली पाच वर्षात खासदारकीच्या माध्यमातून डॉ सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत, तसेच निघोज – अळकुटी जिल्हा परिषद गटात संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. अशाप्रकारे राज्याचे महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना व भाजपच्या नेतेमंडळींना मोठ्या प्रमाणात पाठबळ देउन विकासकामे करीत भाजप पक्ष भक्कम करण्याचे काम खर्‍या अर्थाने केले आहे.

सचिन वराळ पाटील यावेळी म्हणाले, गेली पाच वर्षात खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे देउन मतदारसंघाचा विकास केला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात सत्ता आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यासाठी कार्यकर्त्यांना पाठबळ दिले आहे. अळकुटी निघोज जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील अशी खात्री वराळ पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...