spot_img
ब्रेकिंगRashibhavishya: आजचे राशी भविष्य! आजचा दिवस खास, 'या' राशीचे नशीब बदलणार..

Rashibhavishya: आजचे राशी भविष्य! आजचा दिवस खास, ‘या’ राशीचे नशीब बदलणार..

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री –

मेष राशी भविष्य

धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. जे आपली परिस्थिती समजू शकतात आणि गरज ओळखू शकतात अशा जवळच्या मित्राबरोबर बाहेर फिरायला जा. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात.

मिथुन राशी भविष्य

तुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल.

सिंह राशी भविष्य

तुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे-आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल.जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही.

तुळ राशी भविष्य

मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

धनु राशी भविष्य

आरोग्य चांगले राहील. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर प्रणयराधन करण्याचे विचार घोळतील. टीव्ही, मोबाइलचा वापर चुकीचा नाही परंतु, आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते.

कुंभ राशी भविष्य

वैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे आपल्या सहिष्णूतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरुपी फूट पडू शकते. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्या ही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल.

वृषभ राशी भविष्य

चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या कुटुंबियांबद्दल कायम आपुलकीने वागा, त्यांच्यासोबत प्रेमाचे आनंदाचे चार क्षण व्यतीत करा. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशी भविष्य

आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल.

कन्या राशी भविष्य

भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल – पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल – इतरांची मदत घ्या. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल.

वृश्चिक राशी भविष्य

मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरु शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ घालते. म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा गोष्टी आणखी अवघड होतात. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा.

मकर राशी भविष्य

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. विनाकारण संशय नात्याला खराब करण्याचे काम करते.

मीन राशी भविष्य

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. आज तुम्ही आपला रिकामा वेळ आपल्या आईच्या सेवेमध्ये घालवण्याची इच्छा ठेवाल परंतु, ऐन वेळी कुठल्या कामाच्या येण्यामुळे असे होऊ शकणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून...

विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल ; काय म्हणाले पहा…

संगमनेर / नगर सह्याद्री अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

मुंबई / नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं...