spot_img
मनोरंजनअभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण...

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री

अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नीना गुप्ता यांनी फेमिनिज्मवर स्वतःचं मत व्यक्त केलं होतं. स्त्री आणि पुरुष कधीच समान असू शकत नाही. जेव्हा पुरुष गरोदर राहिल तेव्हा स्त्री-पुरुष समान आहेत, असं मी मानेल असं वतव्य नीना गुप्ता यांनी केलं होतं. त्यानंतर अनेकांनी नीना गुप्ता यांना ट्रोल केलं होतं.

अभिनेत्री कंगना हिने नीना यांची बाजू घेत स्त्री-पुरुषांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. कंगना म्हणाली, नीना गुप्ता यांच्या वक्तव्यावर प्रत्येकजण संताप का व्यक्त करत आहेत? स्त्री आणि पुरुष कधीच समान असू शकत नाही. महिला आणि पुरुष वेगळे आहेत. फक्त स्त्री-पुरुष नाही तर, आपल्यातील प्रत्येक जण वेगळा आहे. म्हणून देव, गुरु, ज्येष्ठ, आई-वडील एवढंच नाही तर, प्रत्येकाचे साहेब देखील वेगळे आहेत.

आपण कोणत्याच स्तरावर समान नाही. आपल्याला पुरुषांची गरज आहे? बिलकूल आहे, जशी महिलांना पुरुषांची गरज असते, त्याच प्रमाणे पुरुषांना देखील महिलांची गरज असते. माझ्या आईला तिचं आयुष्य एकटीने जगावं लागलं असतं, तर तिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या असत्या.

माझे वडील देखील आई शिवाय राहू शकले नसते. यामध्ये लाज कसली? महिन्याचे सात दिवस पुरुषांना रक्तस्राव होत नाही त्यांच्याकडे दैवी शक्ती नाही. महिलांपेक्षा पुरुष अधिक सुरक्षित आहेत. तरुण मुलींसाठी हे सोपे नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार लंके यांचे उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरुच

खा. लंकेंचा आंदोलनस्थळी मुक्काम । डॉक्टरांकडून उपोषणकर्त्यांची तपासणी अहमदनगर । नगर सह्याद्री नगर जिल्हा पोलीस प्रशासनातील...

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मोठे यश; 84930 शेतकर्‍यांना मिळणार इतका पीक विमा

संगमनेर । नगर सह्याद्री माजी कृषीमंत्री तथा काँग्रेस विधिंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या...

कोण म्हणतं महाराष्ट्राला काही नाही? फडणवीसांनी यादीच वाचली

नागपूर । नगर सह्याद्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला...

Pooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! सगळा घोळच घोळ; मोदी सरकारने दिले चौकशीचे आदेश

पुणे / नगर सह्याद्री Pooja Khedkar Case: खासगी कारवर लाल दिवा लावल्याने वादात सापडलेल्या...