spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: सावधान! नगरमध्ये आढळले तीन कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today: सावधान! नगरमध्ये आढळले तीन कोरोना रुग्ण

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. एवढे दिवस आपल्या गावाबाहेर असलेला कोरोना आता आपल्या गावात पोचला आहे. शासकीय नोंदीनुसार राज्यात रविवारी आढळलेल्या १३१ रूग्णांपैकी तीन रूग्ण नगर जिल्ह्यातील आहेत.

महाराष्ट्रात सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी राज्यात तब्बल १३१ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. त्यापैकी नगर जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत.

कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. नाताळ आणि नववर्षामुळे पर्यटन स्थळावर गर्दी वाढली. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शयता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी राज्यात तब्बल १३१ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत.२०२२ जानेवारीमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेयरियंटने धुमाकूळ घातला होता. जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली होती. कोरोना विषाणू म्यूटेशनमुळे नवे व्हेरियंट येत आहेत.

सध्या आलेल्या जेएन१ या कोरोना सब व्हेरियंटसाठी लसीकरणाची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात तीन कोरोना बाधित आढळले असले तरी ते कोणत्या परिसरातील आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...