spot_img
ब्रेकिंगनिमंत्रण फक्त राम भक्तांनाच! 'यांनी' साधला ठाकरे यांच्यावर निशाणा

निमंत्रण फक्त राम भक्तांनाच! ‘यांनी’ साधला ठाकरे यांच्यावर निशाणा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. तसेच निमंत्रण मिळण्याची शयता कमी आहे. या संदर्भात राम मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, २२ जानेवारीला राम मंदिराच्या लोकार्पणासाठी फक्त रामाच्या भक्तांना निमंत्रण देण्यात आले आहे. या वक्तव्याने वादात भर पडण्याची शक्यता आहे.

जे रामाचे भक्त आहे त्यांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे, असे म्हणणे अत्यंच चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वत्र आदर होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठं काम करुन दाखवले आहे.

हे काही राजकारण नाही, ही भक्ती आहे, असे दास म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. भाजप राम मंदिरावरुन राजकारण करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उदात्तीकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

आचार्य सत्येंद्र दास यांनी खा. संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत म्हणतात की प्रभु राम देखील भाजपकडून निवडणूक लढतील. राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजप राजकीय पोळी भाजत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राम यांचा वापर करत आहे, अशी टीका राऊत यांनी केली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...

बापरे! महापालिकेत ६० कोटींचा भ्रष्टाचार? ‘कोणी आणि का केली मागणी?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या...