spot_img
ब्रेकिंगPolitics News:...तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले असते!! 'बड्या' नेत्याचे 'मोठे' वक्तव्य

Politics News:…तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले असते!! ‘बड्या’ नेत्याचे ‘मोठे’ वक्तव्य

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय दिला. सर्व न्यायलयीन प्रक्रिया पार पाडून निकाल देण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटाने केलीले १६ आमदार अपात्रतेची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली. ही मॅचफिक्सिंग असती तर ठाकरे गटाचे १४ आमदार अपात्र ठरले असते, असे मत राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या केस निकाली काढल्या. दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले; मात्र खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता देण्यात आली. तसेच भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड वैध ठरवली. या निकालवर ठाकरे गटाने आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय दिला आहे. यावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, १६ आमदारांच्या अपात्रतेची मागणी कशी चुकीची, हे अध्यक्षांनी सांगितले.

आम्ही ५४ पैकी ४० आमदार शिंदेंसोबत, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, दुसर्‍या गटात गेलो नाही. आम्ही नैसर्गिक युतीत निवडून आलो असताना उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत इच्छे विरोधात सरकारमध्ये सहभागी झालो. सरकार स्थापन करताना २ ते ३ हॉटेलमध्ये आम्हाला ठेवले. त्यावेळी पक्ष प्रमुखांकडे भाजप शिवसेनेचे सरकार असले पाहिजे हे आम्ही वारंवार म्हणत होतो.

विश्वप्रवक्ते ज्या मॅच फिसिंगचा आरोप करत आहेत ते निकाल येईपर्यंत विश्वास ठेवून होते. निकाल आल्यानंतर त्यांचा विश्वास उडाला. जर मॅचफिसिंग असती तर १४ आमदारही अपात्र ठरवले गेले असते. ठाकरे गटाने न्यायालयात जावे. शरद पवार यांनी त्यांना बुस्टर डोस दिला आहे. मात्र आम्ही देखील न्यायालयात आमची बाजू मांडू.

हक्कभंग आणणार…

बुधवारी निकाल जाहीर झाल्यानंतर संजय राऊत व आदित्य ठाकरे यांनी असंसदीय भाषेत वक्तव्य केले आहे. त्यांच्या विरोधात हक्क भंग आणायला हवा. याबाबत आमची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही मंत्री शंभुराज देसाई म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...