spot_img
ब्रेकिंगवेळापत्रक ठरले! आमदार अपात्रता प्रकरण, अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्या...

वेळापत्रक ठरले! आमदार अपात्रता प्रकरण, अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्या गटाच्या..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केल्याने शिवसेना आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरले आहे.

२ जुलैला अजित पवार यांनी पक्षातल्या आमदारांना सोबत घेऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह अजित पवार गटाचे ९ आमदार मंत्री झाले. चाळीसपेक्षा जास्त आमदार अजित पावार यांच्यासोबत गेले. त्यामुळे शरद पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रता प्रकरणासाठी याचिक दाखल केली. याचिकेवर सुनावणीसाठी १२ दिवसांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

या वेळेपत्रकानुसार ९ जानेवारीला फाईल्स किंवा अधिकची, अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे, मात्र ९ तारखेनंतर ऐनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाही. अशा मागणीचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्टपणे बजावले आहे. ११ जानेवारीला याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी होईल.

पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासेल. १२ जानेवारीला याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी होऊन अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.

१४ जानेवारीला सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांच्या समावेशासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्यास संधी असेल. १६ जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होऊन त्यात सुनावणीचे विषय नक्की केले जातील.

१८ जानेवारीला प्रतिज्ञापत्र सादर करणे, २० जानेवारीला अजित पवार गटाच्या साक्षीदारांची उलटतपासणी, २३ जानेवारीला शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलटतपासणी आणि २५ आणि २७ जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद होतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ! मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित, मनोज जरांगेंकडून आज मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे...

रजनीकांत 24 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये धमाका करणार ! ‘या’ सिनेमात झळकणार

मुंबई / नगर सहयाद्री : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा दिग्गज अभिनेता हा त्याच्या वैविध्यपूर्ण...

अभिनेत्री जया प्रदा का आहे फरार? नेमक्या कोणत्या प्रकरणात अडकल्यात? पहा..

मुंबई / नगर सह्याद्री : अभिनेत्री जया प्रदा हे चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव. त्यांनी...

अहमदनगरमध्ये २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार, पालकमंत्री व‍िखे यांचे मोठे सूतोवाच

अहमदनगर / नगर सह्याद्री : औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड...