spot_img
देशईडीची मोठी कारवाई !! माजी आमदाराच्या घरात सापडले सोन्याच्या बिस्कीटासह 'इतके'...

ईडीची मोठी कारवाई !! माजी आमदाराच्या घरात सापडले सोन्याच्या बिस्कीटासह ‘इतके’ कोटी

spot_img

चंदिगढ : माजी आमदाराच्या घरी टाकलेल्या छाप्यात पाच कोटी रोख रकमेसह सोन्याचे बिस्कीटे, अवैध परदेशी हत्यारे, काडतुसे आढळली. त्याच बरोबर काँग्रेसच्या आमदाराशी संबंधित ठिकाणीही छापेमारी सुरू आहे.

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी अवैध खाणकाम प्रकरणात हरयाणाचे काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार, इंडियन नॅशनल लोकदलाचे माजी आमदार दिलबाग सिंह आणि त्यांच्याशी संबंधित २० ठिकाणांवर छापे टाकले. पीएमएलएच्या अंतर्गत यमुनानगर, सोनीपत, मोहाली, फरिदाबाद, चंदिगढ आणि कर्नालमधील विविध ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई २४ तासांनंतरही सुरुच आहे.

ईडीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार दिलबाग सिंह आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या ठिकाणांवर अवैध परदेशी हत्यारे, ३०० काडतुसे, १०० पेक्षा अधिक दारुच्या बाटल्या, ५ कोटी रुपयांची रोकड, ५ किलोग्रॅम सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. देश, विदेशातील त्यांच्या अनेक मालमत्तांची माहितीही ईडीला मिळाली आहे.

सुरेंद्र पंवार सोनीपत विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. दिलबाग सिंह इंडियन नॅशनल लोकदलाचे माजी आमदार आहेत. त्यांनी यमुनानगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. सुरेंद्र पंवार यांच्या घरावर गेल्या २४ तासांपासून ईडीचे छापे सुरू आहेत.

अवैध खाणकाम आणि ई रवाना घोटाळ्याशी संबंधित माहिती त्यांच्याकडून घेण्याचे काम अधिकारी करत आहेत. काल सकाळी आठच्या सुमारास ईडीचे अधिकारी ५ गाड्यांमधून पंवार यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सीआयएसएफचे जवानदेखील सुरक्षेसाठी होते. कोर्टाच्या आदेशानंतर ईडीने या प्रकरणात एफआयआर नोंदवला. पंवार यांच्या घरात ईडीच्या अधिकार्‍यांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...