spot_img
ब्रेकिंगPolitics News: ट्रिपल इंजीनसह निघाली ‘रोड शो’ची जीप!! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज...

Politics News: ट्रिपल इंजीनसह निघाली ‘रोड शो’ची जीप!! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘नाशिकात’

spot_img

नाशिक। नगर सहयाद्री
‘रोड शो’ वेळी एरवी एकटे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये ओपन जीपमध्ये आपल्या सोबत राज्यातील ट्रिपल इंजीन सरकार घेतल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्यांच्यासमवेत होते. नाशिककरांनी या रोड शो वेळी रस्त्याच्या कडेला मोठी गर्दी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले होते. निलगिरी बाग ते रामकुंडापर्यंत पंतप्रधान मोदी यांनी रोड शो केला. एरवी रोड शो किंवा अन्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे एकटेच केंद्रस्थानी असतात. मात्र, नाशिकमधील रोड शो वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ओपन जीपमध्ये राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारचे आधारस्तंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि शिंदे-फडणवीस-पवार ही त्रिमूर्ती असे चित्र रोड शो वेळी पाहायला मिळाले. राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना तिन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जातील, असा राजकीय संदेश या माध्यमातून देण्यात आल्याची चर्चा आहे.

या वाहनात मोदी यांच्या एका बाजूला एकनाथ शिंदे, दुसर्‍या बाजूला देवेंद्र फडणवीस, पाठीमागील बाजूला अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उभे होते. यावरुन अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेकदा अजित पवार भाजपसोबतच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याची चर्चा होते. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौर्‍यात अजित पवार आवर्जून उपस्थित होते.

तत्पूर्वी नाशिकमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यापूर्वी त्यांनी रामकुंड परिसरात प्रतिकात्मक गोदास्नान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोसाठी तपोवन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक येथे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोड शो झाला. रोड शो आणि काळाराम मंदिर दर्शनाच्या माध्यमातून मोदी प्रत्यक्षपणे लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे मानले जाते. नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी नव्या अधिकार्‍यांची फौज स्वागताला पाहायला मिळाली. प्रधान सचिवपदाची सूत्रे नुकतेच स्वीकारलेले नितीन करीर, नवनिर्वाचित पोलिस महासंचालक रश्मी शुला नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला होत्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे पाटलांनी साधला शरद पवारांवर साधला; म्हणाले तुतारी फुंकून काही…

सांगोला / नगर सह्याद्री - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुतारी फुंकून कुठे...

सावधान! विनापरवाना पोस्टर्स लावणाऱ्यावर ‘ती’ कारवाई होणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरात विनापरवाना भिंतीवर, सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करण्याचे...

व्यापारी असोसिएशनचा आयुक्तांपुढे समस्यांचा पाढा; मागणी काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील प्रमुख बाजारपेठेला अतिक्रमण धारकांनी विळखा घातला आहे. या अतिक्रमणांमुळे...

प्रियसीसाठी बायकोला सोडलं, मग तिसरीसोबत जुळलं, खटके उडताच नको तेच घडलं…

Maharashtra Crime News: प्रियकराने प्रियसीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, तरूणाने गर्लफ्रेंडसाठी...