spot_img
ब्रेकिंगAhmednagar: स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा निकाल जाहीर!! सलग दुसर्‍या वर्षी नगर..

Ahmednagar: स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा निकाल जाहीर!! सलग दुसर्‍या वर्षी नगर..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा निकाल जाहीर झाला असून, नगर शहराला स्वच्छता व उपाययोजनांमध्ये एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात देशात ३९ वा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्रात नगर शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी नगरला देशात २८ वा क्रमांक मिळाला होता. यंदा रँकिंगमध्ये घसरण झाली आहे.

केंद्र सरकारकडून दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणात शहरातील स्वच्छता, कचरा संकलन, कचरा विलगीकरण, कचर्‍यावरील प्रक्रिया, निमल वेस्टची विल्हेवाट, स्वच्छतागृहांची तपासणी केली जाते. नागरिकांशी संवाद साधून प्रतिक्रिया घेतल्या जातात. त्यानुसार सर्वेक्षणात ९५०० गुणांपैकी नगर शहराला ७१५५ गुण मिळाले आहेत. यात सिटीझन फीडबॅकमध्ये २१७० पैकी १७९४ गुण, सेवा विषयक उपाययोजनांमध्ये ४८३० पैकी ३९११ गुण, सर्टिफिकेशनमध्ये २५०० पैकी १४५० गुण मिळाले आहेत.

नगर शहराला २०२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणात देशात ४० वा क्रमांक मिळाला होता. सन २०१९ च्या तुलनेत सर्वात चांगली कामगिरी केल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर २०२१ मध्ये आणखी सुधारणा होऊन नगरने २२ व्या क्रमांकावर झेप घेतली. सन २०२२ मध्ये मात्र, रँकिंगमध्ये काहीशी घसरण होत २८ वा क्रमांक मिळाला. आता २०२३ च्या सर्वेक्षणात पुन्हा ३९ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच कचरा मुक्त शहरांच्या यादीत थ्री स्टार व हागणदारी मुक्त शहरांच्या यादीत ओडीएफ++ मानांकन जाहीर झाले आहे. स्वच्छता विषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने, तसेच कचर्‍याची विल्हेवाट लावणार्‍या प्रकल्पाच्या कामात सुधारणा होत नसल्याने रँकिंगमध्ये घसरण होत असल्याचे मानले जाते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पे अँड पार्कवरुन वादावादी!; किरण काळे म्हणाले, मागे घ्या, अन्यथा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे...

आमदार जगताप यांचा शहरात सत्कार; म्हणाले, हिरवी वळवळ थांबवायची असेल तर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा...

१०४ ग्रॅम सोन्यावर डल्ला; प्रोफेसर चौकातील प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख 30 हजाराचे...

भीषण स्फोटाने भंडारा हादरलं! ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट भंडारा | नगर सह्याद्री:- भंडाऱ्यामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची...