spot_img
अहमदनगरलोकसभा लढवण्याची इच्छा ही बायकोची, माझा अद्याप विषय नाही..मी तर दादांचा आज्ञाधारक...

लोकसभा लढवण्याची इच्छा ही बायकोची, माझा अद्याप विषय नाही..मी तर दादांचा आज्ञाधारक ! नेमके काय आ. लंके, पहा..

spot_img

अहमदनगर / नगरसह्याद्री : अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेची सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. त्यात नगर दक्षिणेची जागा आता चांगलीच प्रतिष्ठेची होईल असे दिसते. कारण यात भाजप उमेदवार सुजय विखे व त्यांच्याविरोधात आ. निलेश लंके असतील असे चित्र सध्या तरी आहे.

दरम्यान आता लोकसभेविषयी आ. लंके यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. ते म्हणाले आहेत की, लोकसभा निवडणूक लढवणारच, या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांच्या जाहीर वक्तव्याबद्दल ‘ध’ चा ‘मा’ झाला आहे. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे मतप्रवाह असतात व तो पत्नी राणी लंके यांचा मतप्रवाह आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

* काय म्हणाले आ. निलेश लंके
माझी पत्नी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवणारच, अशा केलेल्या घोषणेबद्दल ‘ध’ चा ‘मा’ झाला आहे. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे मतप्रवाह असतात, तसा तो आमच्याही आहे. पत्नी राणी यांचे ते वेगळे मत आहे. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर कोणतीही निवडणूक मी लढवू शकतो. मात्र, लोकसभेच्या माझ्या उमेदवारीबाबत मला विचारणाही झाली नाही व कोणाशी माझी चर्चाही झालेली नाही असे लंके यांनी स्पष्ट केले.

* पत्नीच्या शिवस्वराज्य यात्रेत हस्तक्षेप केला नाही
दरम्यान राणी लंके यांनी काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेत हस्तक्षेप केला नसल्याचे ते म्हणाले. शिवस्वराज्य यात्रेचे संयोजन राणी लंके यांनी सक्षमपणे केले. यात्रेला प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या कष्टाचे चीज झाले. यात्रेचे नियोजन माझ्याकडे नव्हते व आपल्या उपस्थितीने यात्रेत हस्तक्षेप नको म्हणून समारोपाला आलो असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य; ‘या’ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळणार..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेण्याची घाई करु नका,...

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....