spot_img
देशअरे बापरे ! भाडेकरू शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवले

अरे बापरे ! भाडेकरू शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवले

spot_img

बिहार / नगर सह्याद्री : आजकाल कधी काय घडेल हे सांगता येणेच कठीण होऊन बसले आहे. विवाहासारख्या पवित्र नात्याचेही अगदी मातेरे करून टाकले आहे. आता आणखी एक विचित्र घटना समोर आली आहे. भाडेकरू म्हणून ठेवलेल्या एका शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवून नेल्याची घटना घडली आहे. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील ही घटना असून या महिला पोलिसाला त्या तरुणीवर विश्वास ठेवून तिला रुम दिल्याचा आता पश्चाताप होतोय.

महिला शिपायानेच सुरक्षित म्हणून बीपीएससीमध्ये शिक्षिका म्हणून निवड झालेल्या तरुणीला आपल्या घरातील एका खोलीत भाड्याने रुम दिली होती. परंतु, तिला हे महागात पडले आहे. ही तरुणी तिच्या पतीलाच घेऊन पसार झाली आहे. खूप शोधाशोध केली तरी पती सापडला नाही म्हणून अखेर महिला पोलिसाने पोलिसांत तक्रार दिली आहे.
महिला पोलिसाचा पती अचानक गायब झाल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. लहेरियासराय पोलीस ठाणे क्षेत्रात ती राहत होती. तिचा दोन वर्षांची मुलगी देखील आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीला या महिला पोलिसाचे गाव आहे. तेथील एक मुलगी बिहारमध्ये शिक्षक भरतीसाठी आली होती. तिला या महिला पोलिसाने आपल्याच घरात रुम भाड्याने दिला होता.

त्या तरुणीने परीक्षा पास केली, शिक्षिकाही झाली. एका माध्यमिक शाळेत तिची नियुक्ती झाली. इथपर्यंत सर्व ठीक चालले होते. महिला पोलिसाला तिचा पती आणि शिक्षिकेत काही सुरु असल्याची शंकाही या दोघांनी येऊ दिली नाही. शिक्षिकेला नोकरीला लागून एक महिना होत नाही तोच दोघेही गायब झाले. ती गेली तेव्हा पासून महिला पोलिसाचा पती देखील घरी आला नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...