spot_img
राजकारणभयंकर ! ठाकरे सरकारच्या काळात लोकांच्या जीवाशी खेळ झाला? एकनाथ शिंदे यांनी...

भयंकर ! ठाकरे सरकारच्या काळात लोकांच्या जीवाशी खेळ झाला? एकनाथ शिंदे यांनी केलेली पोलखोल अत्यंत धक्कादायक

spot_img

नागपूर / नगर सह्याद्री : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज चौफेर फटकेबाजी करत ठाकरे सरकारवर मोठा निशाणा साधला आहे. यात त्यांनी विविध गौप्यस्फोट करत महाविकास आघाडीच्या काळातील अनेक घोटाळ्यांची मालिकाच त्यांनी बाहेर काढली. एका मागून एक बॉम्ब त्यांनी टाकले. काय केले मुख्यमंत्र्यांनी गौप्यस्फोट? पाहुयात-

ऑक्सिजन प्लँट – ऑक्सिजन प्लँटची सुरुवात झाली कपड्याचे दुकानतून, रोमिन छेडा नावाच्या व्यावसायिकेचा गंजलेला ऑक्सिजन प्लँट दिल्याने फंगसचा प्रादुर्भाव झाला. त्यात काही लोकांचा जीव गेला. काहींच्या डोळ्यांना त्रास झाला. हे सर्व रेकॉर्डवर असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला. यापूर्वीच्या सरकारचा केवळ पैशाशी मतलब होता असे ते म्हणाले.

टेंडर तिथे सरेंडर – यापूर्वीचे सरकार टेंडर तिथे सरेंडर असे असल्याचा टोला त्यांनी लगावला. कोविड काळात सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर आपल्या स्वकीयांच्या घरी, बाकी जनता फिरते दारोदारी अशी अवस्था होती, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर केली.

आरोग्य व्यवस्थेला आणले रस्त्यावर – रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लँट उभारण्याचे काम देऊन या मंडळींनी संपूर्ण आरोग्यवस्थेलाच रस्त्यावर आणलेल्या हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. कुणाच्या खात्यात किती रक्कम जमा झाली. धनादेशाने व्यवहार झाले. त्याची संपूर्ण माहिती देण्यात येईल असे ते म्हणाले.

खिचडी घोटाळा : कोविड काळात कामगार आणि गोरगरीब वर्गाला मोफत खिचडी वाटपाचे कंत्राट देण्यात आले होते. 33 रुपयांत 300 ग्रॅम खिचडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळ कंत्राटदाराने मापात पाप केले. त्यांनी दुसऱ्या कंपनीला 100 ग्रॅम खिचडीचे कंत्राट दिले. गोरगरिबांचा घास हिरावला. 300 ग्रॅम खिचडीऐवजी 100 ग्रॅम खिचडीचे वाटप करण्यात आले. या कंत्राटदाराचे किचन गोरेगाव येथील एका हॉटेलचा पत्ता दाखविण्यात आला. हे त्या हॉटेल मालकाला पण माहिती नव्हते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! ‘जीवनसाथी डॉट कॉम’ बनावट आयडी, पुढे घडलं असं काही..

मुंबई । नगर सहयाद्री:- हनी ट्रॅपचा वापर करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून महिलांना...

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

मुंबई। नगर सहयाद्री:- महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक...

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...