spot_img
ब्रेकिंगRashibhavishya:आजचे राशी भविष्य ! 'या' राशीसाठी 'असा' असेल 'गुरुवार'...

Rashibhavishya:आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशीसाठी ‘असा’ असेल ‘गुरुवार’…

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री –

मेष राशी भविष्य

आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. नातेवाईकांना भेट देण्याचा अनुभव तुम्हाला वाटला त्यापेक्षा बरा असेल. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही, आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत.

मिथुन राशी भविष्य

तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण, अनर्थावह ठरेल.

सिंह राशी भविष्य

रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे.

तुळ राशी भविष्य

आज तुम्ही केलेले शारिरीक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकतात.

धनु राशी भविष्य

तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल.आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील – आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल.

कुंभ राशी भविष्य

आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल.

वृषभ राशी भविष्य

आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील.

कर्क राशी भविष्य

त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल.

कन्या राशी भविष्य

दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी फक्त तुम्ही त्याला/तिला थोडीशी मदत करण्याची गरज आहे.

वृश्चिक राशी भविष्य

तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल.

मकर राशी भविष्य

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. परंतु स्वार्थी व लगेच चिडणाºया व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते – परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे.

मीन राशी भविष्य

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवल. तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्याावे लागेल. योग्य तो वैद्याकीय सल्ला घ्या, छोटेसे दुर्लक्षदेखील प्रश्न गंभीर करू शकते. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अतिभावूक बोलू नका. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...