spot_img
देशPolitics News: प्रत्येक वाचाळवीराला उत्तर देऊ का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 'त्या'...

Politics News: प्रत्येक वाचाळवीराला उत्तर देऊ का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘त्या’ प्रश्नाला सडेतोड उत्तर

spot_img

पुणे। नगर सहयाद्री-
जो निर्णय तुम्ही ऐकला तसा मीही ऐकला आहे. न्यायाधीशांनी दिलेला निर्णय आपण योग्यच समजतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अपात्रता प्रकरणी निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले. याबाबत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणार का, असे विचारले असता मला कोणी फुकटचा सल्ला देऊ नये, अशा शब्दात त्यांनी माध्यमांना फटकारले.

शिवसेनेतील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा निवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. तसेच शिवसेनेचे सर्व सारेच आमदार पात्र ठरवले आहेत. या निकालानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते गुरूवारी (दि. ११) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकालाचा वेगळा अर्थ काढला आहे, याबद्दल विचारल्यावर ते चिडले. कोण काय भूमिका मांडतात, याच्याशी मला देण-घेण नाही. मी माझ्यापुरते बोलत असतो, असे ते म्हणाले. निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले का? या प्रश्नावर ते म्हणाले, अहो आमचे सरकारच चालू आहे.

मग, कधी अभिनंदन करायचे मी ठरवेन. तुम्ही मला कशाला सांगता? मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पत्रकारांनी पडू नये. माझा स्वभाव सरळमार्गी आहे. तुम्ही एखाद्याचे नाव घेत प्रतिक्रिया विचारता. मुळात कोण काय काय बोलले, याच्याशी मला देणेघेणे नाही. त्याचे मत त्यांनी व्यक्त केलेले असते. मी माझे मत मांडण्यासाठी बसलो आहे.

प्रत्येक वाचाळवीराला उत्तर देऊ का?
आपल्याकडे वाचाळवीर भरपूर आहेत. रोज वाचळवीरांना काहीतरी विधाने केल्याशिवाय झोप लागत नाही. आता प्रत्येक वाचाळवीराला उत्तर देणे, हे माझे काम नाही. मला मिळालेल्या संधीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न आणि अडचणी सोडण्याचे काम मी करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...