spot_img
राजकारणसुषमा अंधारे यांनी ट्विट केला 'हा' व्हिडीओ, महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली मोठी खळबळ

सुषमा अंधारे यांनी ट्विट केला ‘हा’ व्हिडीओ, महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली मोठी खळबळ

spot_img

पुणे / नगर सहयाद्री :
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये पोलिसांची गाडी दिसत आहे. या वाहनातून कैद्यांना काही पाकिटे दिली जात होती, असा आरोप करण्यात आला आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. न्यायालयातून येरवडा कारागृहात कैद्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनात कैद्यांना पाकिटे वाटली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.

पुन्हा एकदा गृहकात्याची अब्रू चव्हाट्यावर आली”, असं म्हणत सुषमा अंधारे यांची फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. हा व्हिडिओ पुण्यातील जेल रोडचा आहे, असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केल आहे.

कसली कडेकोट सुरक्षा, कसला कडेकोट बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये विचारले आहे की, “निर्जन ठिकाणी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत?” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीस गृहखात संभाळण्यासाठी अपयशी ठरले आहेत. तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचं गृहखातं माझ्याकडे द्या”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

नाना पटोले देखील आक्रमक
सुषमा अंधारे यांच्या ट्विटवर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. “पोलीस पैसे घेत आहेत हे काय नवीन नाही. राज्याचं गृहखात काम करण्यासाठी कमी पडत आहे. यांची भाषण खोटी आणि आश्वासन देखील खोटीच”, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. “सुषमा अंधारे यांनी काही नवीन ट्विट केलेलं नाही. जेलमध्ये बसलेल्या बगलबचच्यांसाठी सुविधा मिळत आहे. हे फक्त यरवडाबद्दल नाही. हे गुन्हेगार आणि माफिया यांना संरक्षण देणारं सरकार आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...