spot_img
देशहॉटेलात आढळला विवाहित महिला व 'त्या' तरुणाचा मृतदेह

हॉटेलात आढळला विवाहित महिला व ‘त्या’ तरुणाचा मृतदेह

spot_img

दिल्ली/ नगर सह्यादी
एका हॉटेलच्या रुममध्ये विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विवाहितेस दोन मुले असून तिचे तरुणासोबत प्रेम संबंध असावेत अशी माहिती समोर आली आहे. दिल्लीमधील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. सोहराब (वय 28 वर्ष) आणि आयशा असं या मृतांची नावे आहेत. पोलिसांना तपासात जे माहिती समजली ती ऐकून पोलिसही चक्रावून गेले.

अधिक माहिती अशी : मृत आयशाचे सोहराब (वय २८) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. २७ ऑक्टोबर रोजी दोघांनी एका हॉटेलमध्ये ४ तासांसाठी रुम बुक केली होती. परंतु ४ तास उलटूनही दोघे बाहेर न आल्याने इतरांना शंका आली. त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, दोघांचेही मृतदेह रुममध्ये आढळून आले.

बुधवारी दोघांचाही पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला. या रिपोर्टमध्ये आयशाची गळा दाबून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. तर सोहराब याचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला, असं समोर आलं आहे. सोहराब याने आधी आयशाची हत्या केली. त्यानंतर स्वत: देखील गळफास घेतला असावा, असं पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणात अजून काही माहिती हाती लागते का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...