spot_img
अहमदनगरParner News : पारनेरचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सुजित झावरे यांचा पुढाकार, घेतला...

Parner News : पारनेरचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सुजित झावरे यांचा पुढाकार, घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री -Parner News : चारी, कॅनल च्या संदर्भातील समस्या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या मिटिंग मध्ये मांडणार असून पारनेरचा आवर्तनाचा वेळ किमान पाच ते सहा दिवसांची असावी अशी आग्रहाची मागणी करणार असल्याची माहिती पारनेरचे नेते, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी दिली.

निघोज येथे तालुक्यातील अळकुटी, वाडेगव्हाण, रेणवाडी, चोभुत, निघोज, पठारवाडी, वडनेर, राळेगण थेरपाळ, कोहकडी, जवळा या सर्वच पाणी वापर संस्थाच्या अध्यक्ष व संचालक यांची रविवारी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष, पारनेरचे नेते सुजित झावरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठक बाबाशेठ कवाद यांच्या कार्यालय मध्ये पार पडली.

यावेळी प्रत्येकाने चारी आणि कालवा यासंदर्भातल्या अनेक अडचणी या मिटिंग मध्ये मांडल्या. आज पर्यंत पारनेर तालुक्याला हक्काचं पाणी असताना देखील पुणे जिल्ह्यातुन अन्याय होतो.

या प्रकरणी शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक गावात जाऊन चारी, कॅनल च्या संदर्भातील समस्या भविष्यकाळामध्ये कुकडी कालवा सल्लागार समितीच्या मिटिंग मध्ये मांडण्याचे आश्वासन झावरे पाटील यांनी दिले. दोन -तीन दिवसामध्ये प्रत्येक पाणी वापर संस्थेच एक स्वतंत्र नियोजन व पाणी वापर संस्थेच एक मागणी पत्र जमा करण्याचे बैठकीत ठरले. याच बरोबर पारनेर तालुक्यासाठी 48 तासच पाणी मिळतं आणि नंतर करमाळा पासून ते श्रीगोंदा पर्यंत पाणी दिलं जातं. त्यामध्ये पारनेरचा आवर्तनाचा वेळ किमान पाच ते सहा दिवसाची असावी अशी आग्रहाची मागणी सर्वच अध्यक्षांनी अत्यंत पोटतिडकेने केली. या संदर्भात लवकरच पुणे जिल्याचे पालकमंत्री यांची भेट घेऊन चर्चा करणार असे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.

यावेळी कुकडी कालवा व सल्लागार समिती सदस्य पदी निवड झाल्याबदल झावरे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवाजीराव डेरे, अमृताशेठ रसाळ, श्रीयुजी येवले, शिवाजीराव सुकाळे, चंद्रकांत लामखडे, नवनाथ सालके, दिलीपराव मदगे व अनेक पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, उपस्थित होते
सुमारे दोन तास ही बैठक चालली. या बैठकीला गावातील ही कार्यकर्ते उपस्थित होते. माजी सरपंच उमेश सोनवणे, रवींद्र पाडळकर, संदीप औटी, सचिन लाळगे, मंगेश लाळगे, संकेत लाळगे, कृष्णा लोळगे उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी गणेश जगदाळे / नगर सह्याद्री : पारनेर...

सरकार झुकलं! मागण्या मान्य पण जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे....

पानटपरीवर गॅंगवार; कोयत्याने सपासप वार! शहरात गुन्हेगारांचा कहर, चाललंय काय?, वाचा सविस्तर..

Ahilyanagar Crime News: पानटपरीवर बसलेल्या युवकावर दहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मित्राचे भांडण...

सबसे हटके गौतमी पाटील झटके! ‘टीप टीप बरसा पाणी’ वर स्विमिंग पूलमध्ये डान्स, पहा व्हायरल व्हिडीओ..

मुंबई | नगर सहयाद्री लोकप्रिय लावणी कलाकार आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील पुन्हा...