spot_img
ब्रेकिंगसंतापजनक! ‘जनरल नॉलेज’ च्या शिक्षकाच 'भयंकर' कृत्य, विद्यार्थिनीने जे सांगितले ते ऐकून...

संतापजनक! ‘जनरल नॉलेज’ च्या शिक्षकाच ‘भयंकर’ कृत्य, विद्यार्थिनीने जे सांगितले ते ऐकून सर्वांना धक्का

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री –
मुंबईच्या डोंबिवली एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनींवर शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खाजगी शिक्षक अजितकुमार साहू याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक अजितकुमार साहू ‘जनरल नॉलेज’ या विषयाचे कोचिंग क्लासेस घेतात. तक्रारदार महिलेची आठ वर्षाची मुलगी त्यांच्याकडे होती. आठ वर्षीय मुलगी क्लासवरून घरी आल्यानंतरची मानसिक स्थिती बघून नातेवाइकांनी तिची विचारपूस केली. तिने जे सांगितले ते ऐकून सर्वांना धक्काच बसला.

तिच्यावर लैंगिक अत्याचार केला जात होता. लैंगिक अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर, ती ज्या ठिकाणी क्लासला जाते. त्याच क्लासचा शिक्षक असल्याचे समोर आले. कटूंबाला हकीगत माहिती होताच त्यांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली.

‘गुड टच बॅड टच’ कार्यक्रम गरजेचा

सध्या अनेक शाळांमध्ये शाळकरी मुलींसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या समुपदेशनाचा वर्ग घेतले जातात. त्यात अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. सायकोलॉजिस्ट किंवा इतर डॉक्टर प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतात. या संवादातून विद्यार्थिनींना अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. लैंगिकतेबाबत माहिती दिली जाते. त्यासोबतच गुड टच बॅड टच याची देखील उत्तम प्रकारे माहिती दिली जाते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! 3 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा तर ‘या’ सात जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसणार

Maharashtra Weather: राज्यात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर काही...

अहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर…

Crime News : देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171...

आजचे राशी भविष्य! तुमच्या नशिबात काय?, वाचा सविस्तर

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही...

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...