spot_img
अहमदनगरअशी 'ही' बनवाबनवी! बनावट मालाची 'अशी' पोलखोल, बालिकाश्रम रस्त्यावरील दोन दुकानदारांवर गुन्हा...

अशी ‘ही’ बनवाबनवी! बनावट मालाची ‘अशी’ पोलखोल, बालिकाश्रम रस्त्यावरील दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
बालिकाश्रम रस्त्यावरील दोन कापड दुकानात अंडर अरमोर कंपनीच्या नावाचा वापर करून मूळ कंपनीच्या परवानगी शिवाय बनावट पॅन्ट, शर्ट व जॅकेटची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. दोन्ही दुकानातून तीन लाख १८ हजार ४०० रूपये किमतीचे ४०५ कपडे जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेत्रीका कन्सल्टींग अ‍ॅण्ड इन्व्हेस्टीगेशन इंडिया प्रा.लि. कंपनीचे सिनीअर फिल्ड एझियुटीव्ह दीपक बाबुलाल पटेल (वय ४५ रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. शिव स्पोर्ट्स दुकानातील शाहरूख ईस्माईल शेख (वय २६ रा. मंगलगेट) व श्री स्पोर्ट्स दुकानातील सतिष अशोक सायंबर (वय ३३ रा. कायनेटीक चौक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

नेत्रिका कन्सल्टींग अ‍ॅण्ड इन्व्हेस्टिगेशन इंडिया प्रा.लि. कंपनीकडे अंडर अरमोर कंपनीचे स्वामित्व हक्क व संरक्षणाचे अधिकार आहे. या कंपनीचे सिनीअर फिल्ड एझियुटीव्ह पटेल यांना माहिती मिळाली की, बालिकाश्रम रस्त्यावरील शिव स्पोर्ट्स व श्री स्पोर्ट्स दुकानात अंडर अरमोर कंपनीच्या बनावट पँन्ट, टी शर्ट, जॅकेटची विक्री होत आहे. त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना बुधवारी (दि. ३) पत्र दिले. अधीक्षक ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे एझियुटीव्ह पटेल, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, सचिन अडबल, संतोष खैरे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे यांनी पंचासमक्ष सुरूवातीला शिव स्पोर्ट्स दुकानात कारवाई केली.

तेथे अंडर अरमोर कंपनीच्या बनावट १६२ पॅन्ट व १२६ टी शर्ट असा दोन लाख पाच हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानंतर पथकाने श्री स्पोर्ट्स दुकानात कारवाई केली असता तेथे अंडर अरमोर कंपनीच्या बनावट ४० जॅकेट, ४२ टी शर्ट व ३५ पॅन्ट असा एकूण एक लाख १३ हजार २०० रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा”, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश; जबाबदारी कोणावर पहा…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. भटक्या...

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...