बैलगाडा शर्यतीला ग्रामीण संस्कृतीचा वारसा ः राहुल शिंदे / टाकळी ढोकेश्वरला नमो चषक बैलगाडा शर्यत नगर-पुणे जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद
पारनेर | नगर सह्याद्री
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वरला नमो चषक बैलगाडा शर्यतीला नगर-पुणे जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बैलगाडा शर्यती बंदी ही मोदी सरकारच्या कार्यकाळात उठविण्यात आली असून या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती जपण्याचा वारसा भाजपाने केला असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी म्हटले आहे.
खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून गुरुवार पासून पारनेर तालुयातील टाकळी ढोकेश्वर येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने नमो चषक भरवण्यात आला आहे. या शर्यतीमध्ये लाखोंची बक्षिसे बैलगाडा मालकांना देण्यात येणार आहेत. तसेच आतापर्यंत ४०० हून अधिक बैलगाडा मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. सलग दोन दिवस या स्पर्धा टाकळी ढोकेश्वर येथे चालणार असून बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नगर पुणे नाशिक जिल्ह्यातील अनेक बैलगाडा मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे.
गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी या भव्य बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन कार्यक्रम टाकळी ढोकेश्वर येथे संपन्न झाला. यावेळी पारनेर तालुका भाजपचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, माजी सभापती काशिनाथ दाते, डॉ. राहुल विखे, पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब खिलारी, शिवसेना पारनेर तालुका अध्यक्ष विकास उर्फ बंडू रोहोकले, भाजप तालुका उपाध्यक्ष शिवाजी खिलारी, सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, पारनेर बाजार समितीचे माजी उपसभापती विलास झावरे, पुणेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर, टाकळी ढोकेश्वर सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे, माजी चेअरमन बबनराव पायमोडे, बापूसाहेब रांधवन, बैलगाडा संघटनेचे पारनेर तालुका अध्यक्ष बाळशिराम पायमोडे, संजय झावरे, धोंडीभाऊ झावरे, किरण झावरे, जयसिंग जाधव, लक्ष्मण झावरे, गोरख गोरडे, इंद्रभान गोरडे, बाबासाहेब गागरे, शंकर थोपटे, शिवाजी थोपटे, प्रकाश इघे सर, आदी टाकळी ढोकेश्वर परिसरातील बैलगाडा प्रेमी उपस्थित होते.
भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे म्हणाले की खासदार डॉ सुजय विखे पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामुळे निकोप स्पर्धा व संघ भावना वाढीस लागणार आहे. यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते म्हणाले की पारनेर वर खासदार सुजय विखे पाटील यांचे विशेष प्रेम असून या भागाच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी ते कमी पडून देणार नाहीत तसेच बैलगाडा घाटाला मॉडेल घाट करण्यात येईल अशा प्रकारचे आयोजन करण्यात आल्यामुळे सर्व बैलगाडा मालक व बैलगाडा शर्यत रसिकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण होते. नमो चषक स्पर्धेअंतर्गत विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसे देण्यात आली आहेता त्यामुळे सर्व स्तरातील सर्व नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आनंद मिळवावा असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने आयोजकांनी केले.
चेअरमन अॅड. बाबासाहेब खिलारी म्हणाले नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे हे खर्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण मतदार संघामध्ये आज अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. पारनेर मध्ये ही आज विकासाचा डोंगर उभा राहिला आहे. संसदेमध्ये अभ्यासपूर्ण जनतेच्या प्रश्नांची मांडणी करणारे खासदार म्हणून देशामध्ये खर्या अर्थाने ओळख निर्माण केली. यावेळी नगर व पुण्य जिल्ह्यातील बैलगाडा प्रेमी व शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.