spot_img
अहमदनगर.. मोठा नेता अत्याचार झालेल्या एका स्त्रीला धर्माचं लेबल लावतोय, आ. रोहित...

.. मोठा नेता अत्याचार झालेल्या एका स्त्रीला धर्माचं लेबल लावतोय, आ. रोहित पवारांचा मोठा घणाघात

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. परंतु त्यांच्या या दौऱ्यातील काही वक्तव्यानं धरून मोठी टीका भाजपकडून होत आहे. त्यातच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी रायगडच्या भूमीतून उद्धव ठाकरे यांनी बिल्किस बानोवर दया दाखवली.

अखेर श्रीमान उद्धव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच… अशी टीका केली. परंतु त्यांच्या या टीकेवर झोड उठवत आ. रोहित पवार यांनी पलटवार केलाय. शेलारांसारखा मोठा नेता अत्याचार झालेल्या एका स्त्रीला धर्माचं लेबल लावतोय, असे त्यांनी म्हटलं आहे. हा तुमचा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती? असा सवालही रोहित पवार यांनी केला.

‘अखेर श्रीमान उध्दव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच…! रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच…!! वा! आम्ही सकाळीच म्हटले होते. रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार…! आता रायगडमधेच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का?

त्याचीही एकदा चौकशी करुन.. बघून या!!’, असे ट्वीट शेलारांनी केलं तर निषेध व्यक्त करत रोहित पवार म्हणाले, आशिष शेलार काही मोजक्या अभ्यासू नेत्यांपैकी आपल्याकडं पाहिलं जातं, परंतु तरीही अत्याचार झालेल्या एका स्त्रीला तुमच्यासारखा वकील आणि मोठा नेता धर्माचं लेबल लावत असेल तर हा तुमचा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती? असा सवालच केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...