spot_img
आर्थिककितीही कमवा पैसे, 'या' देशांत एक रुपयाही भरावा लागत नाही Income Tax

कितीही कमवा पैसे, ‘या’ देशांत एक रुपयाही भरावा लागत नाही Income Tax

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर केला. यामध्ये आयकर अर्थात Income Tax वर अनेकांचे लक्ष लागून असते. नोकरदार असो वा व्यापारी, प्रत्येक व्यक्तीला आयकर भरावा लागतो.

जनतेकडून मिळणारा आयकर हा कोणत्याही देशाच्या सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असतो. पण असे काही देश आहेत जिथे सरकारकडून कोणताही कर वसूल केला जात नाही. इथे सरकारला कोणत्याही प्रकारचा आयकर भरावा लागत नाही आणि लोकांचे संपूर्ण उत्पन्न त्यांच्या हातात येते. चला जाणून घेऊया त्या देशांबद्दल-

संयुक्त अरब अमिराती हा देखील करमुक्त देश आहे. येथे कच्च्या तेलाचा व्यापार होतो आणि संपूर्ण अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहे. इथेही लोकांना कर भरावा लागत नाही. आखाती देश बहरीनचे सरकार तेथील नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा कर वसूल करत नाही. बहामास या देशातील जनतेला त्यांच्या उत्पन्नावर सरकारला कोणताही कर भरावा लागत नाही.

ब्रुनेईमध्येही तेलाचे साठे आहेत, येथे राहणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. याशिवाय उत्तर अमेरिका खंडातील कॅरिबियन प्रदेशात येणाऱ्या केमन बेटांवर राहणाऱ्या लोकांनाही त्यांच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही. UAE प्रमाणे, कुवेतमध्ये देखील तेल आणि वायूचे नैसर्गिक साठे आहेत. या दोन्ही गोष्टींतून हा देश चांगला कमावतो आणि त्याचा फायदा इथल्या लोकांना होतो. यामुळेच या देशातील जनतेला आयकर भरावा लागत नाही. भारताच्या सागरी सीमेला लागून असलेल्या मालदीवच्या लोकांनाही आयकर भरावा लागत नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...