पुणे / नगर सह्याद्री : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मुंबईच्या दिशेने चालत आहेत. लाखोंचा जनसमुदाय जमा झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने गोडीगुलाबीने मार्ग काढावा. आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू नये. आपण मरणाला घाबरत नाही. सरकार काय गोळीबार करणार का? जर मला काही झाले तर सरकारचा कायमचा राजकीय सुपडा साफ होऊन जाईल असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे.
आपण सरकार सात महिने दिले होते. आता दीड महिने आम्ही सरकारला 54 लाख नोंदीवर सरकार निर्णय कधी घेणार हे विचारत आहे. सरकारने हे लक्षात घ्यावे आणि मराठा समाजाने सर्व राजकीय पक्षांना दूर केले आहे. मराठा आता फक्त त्याच्या लेकराचाच आहे. आम्ही मुंबईत येणार आणि ओबीसीतून आरक्षण घेणार असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.