मुंबई / नगर सह्याद्री : सुरतमध्ये भव्य हिरे बाजाराचे म्हणजेच सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन 17 डिसेंबर 2023 रोजी झाले. त्यानंतर मुंबईमधील अनेक व्यापारी मुंबईतून गुजरातमधील हिरा मार्केटमध्ये गेले.परंतु महिनाभरातच या बाजारातून व्यापारी काढता पाय घेताना दिसत आहेत. हिरे उद्योगातील आघाडीचे नाव असलेल्या किरण जेम्स कंपनीने सुरतमधून गाशा गुंडाळून पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यापाऱ्यांचा काढता पाय
सुरतमधील हिरे बाजार हा केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा फार महत्त्वकांशी प्रकल्प मानला जातो. मात्र याच प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय किरण जेम्स कंपनीने घेतला आहे. ही कंपनी पुन्हा मुंबईतून आपला कारभार सुरु करणार आहे. सुरत हिरे बाजारामधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून किरण जेम्स कंपनीने काढता पाय घेतल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
सुरतमधील या बाजारापेठेतील अडचणी काय?
किरण जेम्सने सुरतमधील हिरे बाजारातून बाहेर पडताना, सुरतमधील हिरे व्यापाराची चमक अत्यंत वेगाने ओरसत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत ही कंपनी दिवसाला 100 रुपये कमवते असं म्हटलं तर सुरतमध्ये हाच अकडा अवघा 20 रुपये इतका होता.
तसेच सुरत शहर हे हवाई मार्गेने देशातील इतर भागांशी पुरेश्या प्रमाणात जोडलेलं नाही. सुरतमधून हिऱ्यांची वाहतूक कशी करायची हा प्रश्नही व्यापाऱ्यांसाठी गंभीर रुप धारण करत आहे, अशी माहिती बाजाराच्या मुख्य समितीच्या सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तसेच सुरतमधील मुख्य अडचण म्हणजे मुंबईत अनेक कुशल हिरे कामगार मुंबई सोडून सुरतमध्ये स्थलांतरित होण्यास तयार नाहीत.