spot_img
अहमदनगरधक्कादायक! शाळेत गेला पण परतलाच नाही, केडगावमधून शाळकरी मुलाचे अपहरण

धक्कादायक! शाळेत गेला पण परतलाच नाही, केडगावमधून शाळकरी मुलाचे अपहरण

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
केडगाव येथून इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यास पळवले. याबाबत मुलाच्या आईने कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. उदयनराजे राजू क्षेत्रे (वय १५ वर्षे) असे त्या मुलाचे नाव असून प्रतिभा राजू क्षेत्रे (वय ३५ वर्षे, रा. एकनाथनगर, केडगाव) असे फिर्याद दाखल केलेल्या आईचे नाव आहे.

फिर्यादीत महिलेने म्हटले आहे की, माझा मुलगा केडगावमधील एका शाळेत शिक्षण घेत आहे. २१ मार्चला तो सकाळी शाळेत गेला. नंतर शाळासुटल्यावर मी माझा मुलगा उदयनराजे क्षेत्रे याला घेण्यासाठी गेले असता मी शाळेच्या गेटजवळ त्याची वाट पाहत होते.

पण तो शाळेतुन बाहेर न आल्यामुळे वर्गशिक्षकांकडे विचारपूस केली.त्यांनी सांगितले की उदयनराजे हा आज शाळेत आलाच नाही. त्यानंतर परिसरात शोध घेतला, मित्रांकडे विचारणा केली तरी तो मिळाला नाही असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...