spot_img
देशचेन्नईची विजयी सलामी! ऋतुराजचा संघ 'असा' ठरला सुपर किंग

चेन्नईची विजयी सलामी! ऋतुराजचा संघ ‘असा’ ठरला सुपर किंग

spot_img

IPL 2024 CSK vs RCB: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने आपला दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवले. आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवून चेन्नई सुपर किंग्जने विजयी सलामी दिली. चेन्नईत झालेल्या या सामन्यात पुन्हा एकदा यजमान संघाने बाजी मारली. सलामीचा सामना जिंकून चेन्नईने आपला विजयरथ कायम ठेवला आहे. बंगळुरूने दिलेल्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांनी १८.४ षटकांत ४ बाद १७६ धावा करून विजय साकारला.

आव्हानाचा पाठलाग करत असताना सीएसकेला कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या रूपात सुरुवातीलाच मोठा झटका बसला. पण, त्यानंतर रचिन रवींद्र आणि अजिंय रहाणे यांनी मोर्चा सांभाळला. या जोडीने साजेशी खेळी केल्यानंतर डाव पुढे नेण्याची जबाबदारी शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी घेतली. अखेर सांघिक खेळीच्या जोरावर चेन्नईने ६ गडी राखून विजय संपादन केला.

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड (१५), रचिन रवींद्र (३७), अजिंय रहाणे (२७), डॅरिल मिचेल (२२), शिवम दुबे (३४ नाबाद) आणि रवींद्र जडेजाने नाबाद (२५) धावा केल्या. आरसीबीकडून कॅमरून ग्रीन तर आणि यश दयाल आणि कर्ण शर्मा यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

दरम्यान, संघ अडचणीत असताना दिनेश कार्तिकने आपल्या अनुभवाचा फायदा घेत संयमी खेळी केली, त्याला अनुज रावतने मोलाची साथ दिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फाफ डुप्लेसिस (३५), रजत पाटीदार (०), ग्लेन मॅसवेल (०), कॅमरून ग्रीन (१८) आणि विराट कोहलीने (२१) धावा केल्या. याशिवाय अनुज रावतने (४८) आणि दिनेश कार्तिकने नाबाद (३८) धावा कुटल्या. ११.४ षटकांत आरसीबीची धावसंख्या ५ बाद केवळ ७८ धावा अशी होती.

संघ अडचणीत असताना दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी डाव पुढे नेला. या जोडीने ५० चेंडूत ९५ धावा केल्या. चेन्नईकडून मुस्तफिजुरने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्याने ४ षटकांत ३० धावा देत ही किमया साधली. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी १७४ धावांचे आव्हान दिले होते, ज्याचा गतविजेत्यांनी सहज पाठलाग केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar News : शाळेची घंटा वाजली! कुठे रडारड, कुठे पळापळ; पहिल्या दिवशी कुठे काय घडलं पहा…

शाळांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत अहमदनगर | नगर सह्याद्री Ahmednagar News : दोन महिन्यांची सुट्टी संपून...

काँग्रेसकडून २८८ जागा लढण्याची तयारी, पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ…

भंडारा:नगर सह्याद्री लोकसभा निवडणुका संपताच राज्यात आता सर्वच पक्षांन विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. येत्या...

काँग्रेसच्या महिला खासदाराचा अशोक चव्हाणांना सल्ला..म्हणाले..

  मुंबई : नगर सह्याद्री राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश...

शिंदे गटाच्या दोन नेत्यांचं मोठं विधान; भाजपला इशारा ?

बई:नगर सह्याद्री मोठा भाऊ छोटा भाऊवरून महाविकास आघाडीतील वाद थांबलेला असतानाच आता या वादाने महायुतीत...