spot_img
ब्रेकिंगBreaking: कुख्यात गँगस्टर अडकला जाळ्यात! चीनमध्ये ठोकल्या बेड्या, 'असा' लावला सापळा

Breaking: कुख्यात गँगस्टर अडकला जाळ्यात! चीनमध्ये ठोकल्या बेड्या, ‘असा’ लावला सापळा

spot_img

Breaking News: २००८ पासून चीनमध्ये वास्तव्यास असलेला मुंबईचा कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी याला चीनमधून भारतात आणण्यात आले. मोस्ट वाँटेड व्यक्तीला चीनमधून भारतात पाठवण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. प्रसाद गेल्या २० वर्षांपासून फरार होता. इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. प्रसाद पुजारी याच्याविरोधात मुंबईत खून, धमकावणे, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुंड प्रसाद पुजारी याची आई इंदिरा विठ्ठल पुजारी यांनाही खंडणी प्रकरणात अटक केली होती.

मुंबईत एकेकाळी प्रसाद पुजारी यांची खूप मोठी दहशत होती. खून आणि बेकायदेशीर खंडणीचे डझनभर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. गुन्हेगारी हाच त्याने आपला व्यवसाय बनवला होता. त्याचे कुटुंबही त्याच्या गैरकृत्यांमध्ये सक्रिय होते. एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर राज्य करणारा पुजारी चीनमध्ये जाऊन लपला होता. शेकडो किलोमीटर दूर राहूनही तो देशविरोधी कारवायांमध्ये सामील होता. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

काही वर्षांपूर्वी प्रसाद पुजारी याने शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. १९ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या या हल्ल्यात चंद्रकांत यांचा जीव वाचला होता. २०२० मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रसाद पुजारी याची आई इंदिरा यांना खंडणी प्रकरणात अटक केली. ६२ वर्षीय इंदिरा आणि सुनील आंगणे, सुकेश कुमार यांच्यावर मुंबईतील एका बिल्डरकडून १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

प्रसाद पुजारी याच्यावर भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (चउजउ) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्र सरकारने मोस्ट वॉन्टेड आरोपींची यादी तयार करून त्यांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु केली होती. याच मोहिमेत गुंड प्रसाद पुजारी याला चीनमधून मुंबईत आणण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...

प्रवरेला पूर; अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावांचा संपर्क तुटला

संगमेनर । नगर सहयाद्री:- अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात...

पारनेरकरांना खुशखबर! सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्यास यश; ‘या’ कामांसाठी जलसंपदा विभागाची मंजुरी

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील कुकडी डावा कालव्यावरील पुलांच्या कामांस मंजुरी देण्याचे निर्देश जलसंपदा...