मुंबई । नगर सहयाद्री:-
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्यासोबत दुर्दैवी प्रकार घडला आहे. त्यांच्या स्वतःच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली. त्यामुळे गोविंदा जखमी झाले आहेत. घटनेत गोळी त्यांच्या पायात शिरली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदा सकाळी पाच वाजताच्या सुमारास घराबाहेर पडताना या दुर्घटनेचा सामना करावा लागला. त्यांच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे. घरात एकटे असताना त्यांनी बंदूक साफ करताना चुकून गोळी झाडली, जी थेट त्यांच्या पायात लागली.
त्यानंतर गोविंदा यांना क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, आणि त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया देखील पार पडली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या प्रकरणी आता जुहू पोलिसांनी त्याची बंदूक ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरु आहे. याबद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडिया व्हायरल होतानादेखील दिसत आहेत. दरम्यान हा प्रकार नक्की कसा घडला याबद्दल तर्क-वितर्क मांडण्यात येत आहेत.