spot_img
ब्रेकिंगउमेदवार निवडण्यासाठी भाजप राबवणार 'राजस्थान पॅटर्न'; विधानसभेसाठी आखला मास्टरप्लान? वाचा सविस्तर..

उमेदवार निवडण्यासाठी भाजप राबवणार ‘राजस्थान पॅटर्न’; विधानसभेसाठी आखला मास्टरप्लान? वाचा सविस्तर..

spot_img

Vidhan Sabha Election 2024: आगामी विधानस निवडणुकीसाठी भाजपने महायुतीत 160 जागा लढवण्याचा महत्वाकांक्षी प्लान तयार केला आहे. यामध्ये मित्रपक्षांना 128 जागा देण्याची योजना आहे, परंतु भाजपने खास रणनीती तयार केली आहे. उमेदवार निवडण्यासाठी भाजपने राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये वापरलेला फॉर्मुला राज्यात वापरण्याचा प्लान आखला आहे.

भाजपने 160 मतदारसंघांसाठी 160 पक्ष निरीक्षक नियुक्त केले आहेत. या निरीक्षकांच्या माध्यमातून आज आणि उद्या उमेदवारांचा आढावा घेण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांकडून संभाव्य उमेदवारांच्या नावे मागवण्यात येणार असून, प्रत्येक मतदारसंघातील योग्य उमेदवारांची माहिती संकलित केली जाणार आहे.

प्रत्येक मतदारसंघात किती जण निवडणूक लढविण्यासाठी सक्षम आहेत ? याची चाचपणी केली जाणार आहे. संभाव्य उमेदवारांची नावे, आणि इच्छूकांची माहिती घेण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार आहे.एकत्र केलेले लिफाफे भाजप कार्यालयात जमा होतील, जिथे भूपेंद्र यादव आणि चंद्रशेखर बावनकुळे ते उघडून मतदारसंघातील उमेदवार ठरवणार आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...