spot_img
ब्रेकिंगगाडीखाली येऊन सलमान खानचा मृत्यू ! वातावरण संतप्त, भाजपा नेत्यांच्या गाड्या फोडल्या

गाडीखाली येऊन सलमान खानचा मृत्यू ! वातावरण संतप्त, भाजपा नेत्यांच्या गाड्या फोडल्या

spot_img

छतरपूर / नगर सह्याद्री : सध्या पाच राज्यात निवडणूक आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणची परिस्थिती जरा आक्रमक आहे. परंतु आता याच दरम्यान एक मोठी बातमी आली आहे.

काँग्रेस नेते सलमान खान यांचा कारने चिरडल्यामुळे मृत्यू झाल्याने छतरपूर जिल्ह्यातील राजनगर विधानसभा मतदारसंघातील लवकुश नगरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी भाजपा नेत्यांच्या वाहनांवर दगडफेक करत तोडफोड केली.

लोकांनी लाठ्या-काठ्यांनी गाड्यांच्या काचा फोडल्या. राजनगर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि जिल्हा काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष कुंवर विक्रम सिंह नाती राजा यांचे समर्थक सलमान खान यांच्या मृत्यूमुळे राजकारण तापलं आहे.

काँग्रेसने भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार अरविंद पटेरिया यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. मतदान संपल्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. तेव्हा विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार कुंवर विक्रम सिंह नाती राजा आणि भाजपाचे उमेदवार अरविंद पटेरिया यांच्या समर्थकांमध्ये तोरिया टेकजवळ वाद झाला. वाद थोडा कमी झाल्यावर दोन्ही पक्षांची वाहने पुढे सरकली.

काँग्रेसचे उमेदवार कुंवर विक्रम सिंह नाती राजा यांनी आरोप केला की, मी माझा सहकारी आणि जिल्हा काँग्रेस स्पोर्ट्स सेल अध्यक्ष सलमान खान यांच्यासोबत खाली उतरलो. तेवढ्यात मागून येणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांच्या वाहनांचा आवाज आला, मी धावत पुन्हा गाडीत बसलो. मात्र सलमान कारमध्ये बसू शकले नाहीत आणि मागून येणाऱ्या एका कारने त्यांना चिरडलं. दरम्यान या घटनेनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...