spot_img
महाराष्ट्रब्रेकिंग ! ‘भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा’, संभाजीराजे नेमकं काय म्हणालेत, पहा...

ब्रेकिंग ! ‘भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा’, संभाजीराजे नेमकं काय म्हणालेत, पहा सविस्तर

spot_img

कोल्हापूर / नगर सह्याद्री : सध्या आरक्षण हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा समाजाने आरक्षण मागणीसाठी अनेक आंदोलने केली. परंतु आता आता या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाचे नेते आमने-सामने आले आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे मोठी सभा घेऊन त्यांनी एल्गार देखील केला. परंतु आता या वादात संभाजीराजे छत्रपती यांनी उडी घेतली आहे. छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत.

त्यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. फेसबूकवर लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटलं हे की – भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत.

सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.

सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी आक्रमक मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर ब्रेकिंग ! गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर हल्ला, माळीवाड्यात पोलिसांचा फौजफाटा

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगरच्या बालिकाश्रम रोड परिसरात काही दिवसांपूर्वी ओंकार उर्फ...

Ahmednagar: शहरासह जिल्ह्यात जोर ‘धार’

रस्त्यांवर अर्धाफुट पाणी; नगरकरांची अक्षरश: त्रेधातिरपीट अहमदनगर | नगर सह्याद्री मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत...

Ahmednagar: पत्र आले आमदारांचे, ‘माफी’ सूचली प्रशासनाला

शास्तीच्या रकमेत सवलत देण्याची परंपरा कायम ः आता प्रतिसादाकडे लक्ष अहमदनगर | नगर सह्याद्री आमदारांनी पत्र...

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...