spot_img
राजकारणआ. रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात

आ. रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी फुटल्यानंतर आ. रोहित पवार हे महाराष्ट्र पिंजून कढत आहेत. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक भागात जाऊन लोकांशी संवाद सद्द्त समस्या जाणून घेतल्या.

त्या सर्व गोष्टींचे निवेदन देण्यासाठी नागपूर येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला व ही सर्व निवेदने देण्यासाठी त्यांनी त्यांचा मोर्चा थेट विधानभवनावर नेला. मात्र, पोलिसांनी संघर्ष यात्रा रस्त्यातच अडविल्याने रोहित पवार यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी रोहित पवारांना ताब्यात घेतले.

निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारच्या वतीने कुणीतरी सभास्थळी यावे असे आवाहन रोहित पवारांनी केले होते. पण सभा संपल्यानंतरही कुणी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह निवेदन ठेवलेल्या बैलगाडीसह विधानभवनाकडे कूच केले. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यात झटापट झाली.

लाठीचार्जनंतर कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनीही बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या संघर्षात आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, रोहित पाटील, सलील देशमुख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पूजा पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आ. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना युवा संघर्ष यात्रेतील मागण्यांचे निवेदन दिले. नागपूर विधिमंडळात रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी, ८०० किमी चालत काढलेल्या संघर्ष यात्रेत भेटलेल्या युवकांनी, शेतकऱ्यांनी, नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे आणि मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिले. तसेच, युवा आणि जनतेच्या या मुद्द्यांवर या अधिवेशनात निर्णय घेतला तर आमच्यावर झालेला लाठीचार्ज आम्ही नक्कीच विसरून जाऊ, असेही आमदार पवार यांनी म्हटले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...