spot_img
अहमदनगरParner News: पारनेरच्या कुटुंबाची 'कोण बनेगा करोडपती' कार्यक्रमास हजेरी! बिग बी च्या...

Parner News: पारनेरच्या कुटुंबाची ‘कोण बनेगा करोडपती’ कार्यक्रमास हजेरी! बिग बी च्या भेटीने ऊर्जा..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री

पारनेर तालुक्यातील अळकुटी, निघोज येथील मूळ गावं असलेले व सध्या शिरूर येथे वास्तव्यास असलेले व कृषी विभागातून नुकतेच सेवा निवृत्त झालेले अधिकारी अविनाश पंदारे यांनी सहकुटुंब सोनी टी व्हि वरील “कोण बनेगा करोडपती” या कार्यक्रमास नुकतीच हजेरी लावली.

अविनाश पंदारे व जयश्री पंदारे यांचा मुलगा प्रतिक पंदारे याने मुंबई येथे मास मीडिया व फोटोग्राफीचे शिक्षण घेऊन आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याने विविध सिनेमाचे चित्रीकरण करून फोटो शूट केलेले आहे.त्याच्या सहकार्यानेच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची संधी या कुटुंबास मिळाली.

नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रॉडक्शन्स अंतर्गत दोन वर्षांपूर्वी प्रदर्शीत झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या “झुंड” या सिनेमाचे फोटो शूट व ड्रोनच्या साहाय्याने चित्रीकरण प्रतिक याने केले होते. नुकतीच या कुटुंबाने फिल्म सिटी मुंबई येथे “कोण बनेगा करोडपती” या कार्यक्रमाचे चित्रीकरण कसे केले जाते याचा 5-6 तास प्रत्यक्ष अनुभव अगदी जवळून घेतला.

अमिताभ बच्चन यांचेशी चर्चा करताना आपल्यालाही ऊर्जा मिळते. या वयातही वेळेला महत्व देऊन काम करण्याची त्यांची पद्धत अलौकिक आहे. त्यांच्या भेटीने आम्ही अगदी भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले. इतका मोठा अभिनेता असून सुद्धा जनता जनार्दन यांच्या प्रेमामुळं मला हे शक्य झाले अशी प्रतिक्रिया बिग बी यांनी नोंदविली. यातच त्यांची महानता दिसून येते.

सध्या प्रतिक याने शिरूर येथे “प्रतिक मीडिया” या नावाने फर्म सुरु केली असून मीडिया संबंधित कामे केली जातात. शिरुर शहरात प्रतिक यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. पारनेर व शिरुर तालुक्यात कार्यरत असणारे अविनाश पंदारे यांचे कुटुंबीय अमिताभ बच्चन यांना भेटले बच्चन यांनी त्यांना वेळ देऊन चर्चा केली याबद्दल पंदारे यांचे सर्वत्र कौतुक होत असून नगर,पुणे मुंबई येथील त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अविनाश पंदारे हे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला प्रतिक याने वडील अविनाश यांच्याकडून मार्गदर्शन घेत आज एक उत्कृष्ट फोटोग्राफर तसेच चित्रपट शुटींग, टी व्हि मालिका शुटींग करीत लोकप्रियतेच्या शिखरावर काम करीत असून पारनेर व शिरुर तालुक्यातील युवकांना प्रेरणादायी काम करीत असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...