spot_img
अहमदनगरआ. लंके यांच्या फराळ कार्यक्रमात आ. राम शिंदे यांची बॅटिंग ! दिले...

आ. लंके यांच्या फराळ कार्यक्रमात आ. राम शिंदे यांची बॅटिंग ! दिले ‘हे’ मोठे चॅलेंज

spot_img

पारनेर/नगर सह्याद्री : राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी हंगा (ता. पारनेर) येथे दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजपचे आ. राम शिंदे यांनी हजेरी लावली. त्यांनी या ठिकाणी शानदार बॅटिंग केली.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधील सरपंच, उपसरपंच, सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व ३० हजार कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला. फराळ निमित्त मिसळ-पुरीचा बेत होता.

कार्यक्रमात बोलताना आ. राम शिंदे म्हणाले, आम्ही एकत्र आलो तर बर्‍याच लोकांना वाटते हे कसे एकत्र आले? जसे दुसरे एकत्र आले तसेच आम्ही एकत्र आलो ! मी देखील छोटा नाही, माजी पालकमंत्री आहे. कोणी कोणाशी बोलू नये अशी आपल्या राज्याची, जिल्ह्याची संस्कृती नाही.

एकमेकांच्या दिवाळी फराळाला गेले पाहिजे. काय अर्थ काढायचा ते ज्याने त्याने समजायचे आहे, असे आ. राम शिंदे म्हणाले. लंके यांच्या फराळाचा शेवट करायला मी आलो. सुरूवात आपणच करू व शेवटही आपणच करू. कोणत्याही कामाचे नेटके नियोजन करू शकतो, याचे महाराष्ट्रात एकमेव उदाहरण म्हणजे आ. नीलेश लंके हे आहेत. कोविड काळात आ. लंके यांनी हजारो लोकांचे जीव वाचविले. मोहटा देवीचे नियोजन पाहून तर मी चकीत झालो. लोकप्रतिनिधीकडून जनतेच्या खूप अपेक्षा असतात. त्या पूर्ण करण्याचे काम आ. लंके करत असतात असे कौतुकही त्यांनी केले.

यावेळी माजी. आ. दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे आदींसह ३० हजार कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...