spot_img
अहमदनगरआ. लंके यांच्या फराळ कार्यक्रमात विखे विरोधक एकवटले, केला 'हा' मोठा एल्गार

आ. लंके यांच्या फराळ कार्यक्रमात विखे विरोधक एकवटले, केला ‘हा’ मोठा एल्गार

spot_img

पारनेर/नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी हंगा (ता. पारनेर) या आपल्या गावी दिवाळी फराळाचे आयोजन करत शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमात भाजपचे आ. राम शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे आदींसह भाजप नेत्यांची मांदियाळी होती. दिवाळी फराळात राजकीय फटाकेही फुटले. यावेळी सर्व विखे विरोधक एकवटलेले दिसले.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधील सरपंच, उपसरपंच, सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व ३० हजार कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला. फराळ निमित्त मिसळ-पुरीचा बेत होता. कार्यक्रमात आ. राम शिंदे म्हणाले, लंके यांच्या फराळाचा शेवट करायला मी आलो. सुरूवात आपणच करू व शेवटही आपणच करू. कोणत्याही कामाचे नेटके नियोजन करू शकतो, याचे महाराष्ट्रात एकमेव उदाहरण म्हणजे आ. नीलेश लंके हे आहेत.

कोविड काळात आ. लंके यांनी हजारो लोकांचे जीव वाचविले. मोहटा देवीचे नियोजन पाहून तर मी चकीत झालो. लोकप्रतिनिधीकडून जनतेच्या खूप अपेक्षा असतात. त्या पूर्ण करण्याचे काम आ. लंके करत असतात.

यावेळी माजी. आ. दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र गुंड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक विक्रम राठोड, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, बाळासाहेब नाहाटा, प्रदीप परदेशी, विठ्ठल काळे, अरूण तुकाराम लांडगे आदी उपस्थित होते.

अहंकार्‍यांना घरी बसविण्यासाठी आ. लंके यांना साथ द्या : कोल्हे 
दिवसभर भेटी देत इथे आल्यावर आमचा सगळा थकवा निघून गेला. कोविड काळात मी आ. नीलेश लंके यांचे काम पाहिले. त्याच वेळी या माणसाचा संपूर्ण महाराष्ट्राला कसा फायदा होईल, याची पहायला पाहिजे, असे ठरविले होते. आज अहंकारी विचाराचे लोक खाली बसविण्यासाठी आ. लंके यांच्यासारख्या देव माणसासोबत सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. नीलेश लंके ही एक व्यक्ती नाही. तो एक समुह आहे, असे वक्तव्य जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर ब्रेकिंग ! गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर हल्ला, माळीवाड्यात पोलिसांचा फौजफाटा

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगरच्या बालिकाश्रम रोड परिसरात काही दिवसांपूर्वी ओंकार उर्फ...

Ahmednagar: शहरासह जिल्ह्यात जोर ‘धार’

रस्त्यांवर अर्धाफुट पाणी; नगरकरांची अक्षरश: त्रेधातिरपीट अहमदनगर | नगर सह्याद्री मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत...

Ahmednagar: पत्र आले आमदारांचे, ‘माफी’ सूचली प्रशासनाला

शास्तीच्या रकमेत सवलत देण्याची परंपरा कायम ः आता प्रतिसादाकडे लक्ष अहमदनगर | नगर सह्याद्री आमदारांनी पत्र...

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...