spot_img
ब्रेकिंगPost Office: पोस्टाची फायदेशीर योजना, घरपोच मिळणार सेवा; जाणून घ्या सविस्तर

Post Office: पोस्टाची फायदेशीर योजना, घरपोच मिळणार सेवा; जाणून घ्या सविस्तर

spot_img

Post scheme: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचा विमा असणे ही काळाची गरज बनली आहे. कारण कधी कुणाच्या जीवनात अपघाता सारखा दुर्दैवी प्रसंग येईल हे सांगता येत नाही. अपघातामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास सर्व कुटुंब निराधार होते. शिवाय अपघात झाल्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी देखील भरमसाट खर्च येतो. त्यामुळे त्या कुटुंबाची आर्थिक घडी बिघडते.

बहुतांशी सर्वसामान्य व्यक्ती हेल्थ / मेडिकल पॉलिसी देखील घेत नाही कारण त्याचा हप्ता त्यांना परवडत नाही. परंतु या सर्व बाबींवर उपाय म्हणून पोस्ट खात्याने मागील वर्षापासून अत्यंत कमी खर्चात अपघात विमा पॉलिसी आणली आहे. त्याचा लाभ अनेकांना होत आहे.

फक्त 399 मध्ये दहा लाख रुपयाचे अपघाती विमा पॉलिसी पोस्टामार्फत उघडली जाणार आहे. या पॉलिसीचा लाभ सर्वसामान्य व्यक्तीला व्हावा यासाठी पोस्ट खात्याने *सर्व सुरक्षा अभियान* सुरु केलेले आहे. यामध्ये १ नोव्हेंबर पासून प्रत्येक गावामध्ये विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ही विमा पॉलिसी कशी पोहोचवता येईल, तसेच सर्वसामान्य नागरिकांना या पॉलिसीचा लाभ मिळेल यासाठी विशेष प्रयत्न पोस्ट खात्यामार्फत केले जात आहेत.

इतक्या कमी हप्त्यामध्ये अशी पॉलिसी अन्य कोठेही उपलब्ध नाही. जास्तीत जास्त नागरिकांनी पोस्टाची अपघात विमा पॉलिसी घेऊन स्वतःला तसेच कुटुंबाला सुरक्षित करावे असे आवाहन अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक सुरेश बनसोडे यांनी केले आहे.

काय आहे अपघात विमा पॉलिसी

१) १८ ते ६५ वयोगटातील व्यक्तीसाठी
२) वार्षिक हप्ता फक्त रू. ३९९ (टाटा ए आय जी) व रू. ३९६ (बजाज इन्शुरन्स)
३) अपघाती निधन झाल्यानंतर वारसास रू १० लाख रुपये
४) अपघातामुळे कायम स्वरुपी अपंगत्व आल्यास रू १० लाख रुपये
५) अपघातामुळे अंशतः अपंगत्व आल्यास रू १० लाख रुपये
६) अपघातामुळे येणारा वैद्यकीय खर्च रु. ६०००० पर्यंत ( आंतर रुग्ण) व रू. ३०००० पर्यंत ( बाह्य रुग्ण)
७) याशिवाय अपघातामुळे निधन झाल्यास अंत्यविधी खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, प्रवास खर्च यांचा देखील समावेश आहे.

पॉलिसी कशी घेता येईल

कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये ही अपघात विमा पॉलिसी घेता येईल. सर्व पोस्टमन यांना मोबाईल फोन देण्यात आलेले आहेत. पोस्टमन आपल्या मोबाईल वरुन पॉलिसी काढून देतात. यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. फक्त आधार क्रमांक, मोबाईल व ई मेल आय डी ची गरज आहे.

सर्वसामान्य नागरिकांना लाभ

सर्व पोस्टमन तसेच ग्रामीण डाक सेवक यांना जास्तीत जास्त नागरिकांच्या अपघात विमा पॉलिसी उघडण्याबद्दल सूचित केले आहे. त्यानुसार बहुतांशी गावामध्ये विशेष कॅम्प देखील आयोजित करणार आहोत. सर्वसामान्य नागरिकांना याचा निश्चितच लाभ मिळेल.-

संदीप हदगल ( सहाय्यक डाक अधीक्षक, अहमदनगर विभाग )

निघोज पोस्ट कार्यालयात कार्यरत असणारे दिलीप उनवणे यांनी निघोज येथील मंळगंगा बचत गटाच्या अध्यक्षा सविता हरिश्चंद्र गायखे यांच्या घरी जाऊन त्याना विमा पॉलिसी दिली असून निघोज व परिसरात मोठ्या प्रमाणात या विमा पॉलिसीला प्रतिसाद मिळाला आहे. सविता गायखे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की पोस्ट कार्यालयाने विमा पॉलिसी चांगली योजना सुरू केली असून पोस्ट कार्यालयातील लोक घरोघर जाऊन या पॉलिसीची माहिती देत असून चांगली सेवा देत असून लोकांना फायदेशीर योजना पोस्ट कार्यालय राबवीत असल्याची माहिती गायखे यांनी देउन त्यांचे कौतुक करीत धन्यवाद व्यक्त केले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Crime: नगर पुन्हा हादरले! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या

अहमदनगर । नगर सहयाद्री- नगर शहर पुन्हा एका घटनेने हादरले आहे. किरकोळ कारणावरून दोन परप्रांतीय...

कुकडी कालव्यालाच्या आवर्तना बाबत सुजित झावरे पाटलांनी दिली महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर

अमर भालके। नगर सहयाद्री कुकडी डावा कालव्याचे येत्या ३१ मे पासून आवर्तन सोडण्यात येणार...

Ahmednagar Breaking: प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या २ युवकांचा शोध घेण्यासाठी आलेल्या ‘एसडीआरएफ’ पथकाची बोट उलटली? ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

अहमदनगर । नगर सहयाद्री- जिल्ह्यांमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रवरा नदी पात्रात बुडालेल्या...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना मिळणार खुशखबर..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्यावर आपले निर्णय मते लादू नका,...