spot_img
अहमदनगरAhmednagar News : कौटुंबिक वादातून 'राडा' ! सुनेने सासूला, मेहुण्यांनी दाजीला धु...

Ahmednagar News : कौटुंबिक वादातून ‘राडा’ ! सुनेने सासूला, मेहुण्यांनी दाजीला धु धु धुतले

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
Ahmednagar News : जुन्या वादातून पत्नी व मेहुण्यांनी पतीसह त्याच्या आईला जबर मारहाण करण्याची घटना घडली. राहुल सुनील खरात (रा. पाईपलाईन रोड, अ.नगर)असे मारहाण झालेल्या पतीचे नाव असून माया खरात असे मारहाणीत जखमी झालेल्या त्याच्या आईचे नाव आहे
.

पत्नी भारती खरात (रा. पाईपलाईन रोड, या.नगर), कैशल्या सावळा कांबळे, विक्की सावळा कांबळे, अक्षय सावळा कांबळे (सर्व रा. हाडपसर जिल्हा पुणे) असे आरोपींचे नावे आहेत. ही घटना ४ ऑक्टोबर २०२३ ला पहाटे घडली.

राहुल खरात यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पहाटे मला माझ्या आईचा ओरडण्याचा आवाज आल्याने मी तिच्या खोलीत आलो. तेथे जुन्या वादावरुन पत्नी भारती व इतर आरोपी हे आईला मारहाण करत होते. मी भांडण सोडवण्यास गेलो असता मलाही मारहाण करण्यात आली.

हा गोंधळ ऐकून माझे भाऊ विक्की खरात व आकाश हे भांडण सोडवण्यास पुढे आले. तर आरोपींची त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर डायल 112 ला फोन करुन सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत सर्वाना समज दिली. त्यानंतर सुनील यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार लंके यांचे उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरुच

खा. लंकेंचा आंदोलनस्थळी मुक्काम । डॉक्टरांकडून उपोषणकर्त्यांची तपासणी अहमदनगर । नगर सह्याद्री नगर जिल्हा पोलीस प्रशासनातील...

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मोठे यश; 84930 शेतकर्‍यांना मिळणार इतका पीक विमा

संगमनेर । नगर सह्याद्री माजी कृषीमंत्री तथा काँग्रेस विधिंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या...

कोण म्हणतं महाराष्ट्राला काही नाही? फडणवीसांनी यादीच वाचली

नागपूर । नगर सह्याद्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला...

Pooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! सगळा घोळच घोळ; मोदी सरकारने दिले चौकशीचे आदेश

पुणे / नगर सह्याद्री Pooja Khedkar Case: खासगी कारवर लाल दिवा लावल्याने वादात सापडलेल्या...