spot_img
महाराष्ट्रPolitical News : 'वंचित' महाविकास आघाडीत सामील ! लोकसभेसाठी 'या' सहा जागा...

Political News : ‘वंचित’ महाविकास आघाडीत सामील ! लोकसभेसाठी ‘या’ सहा जागा लढवणार?

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. महाविकास आघाडीमध्ये आता वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांचा महाविकास आघाडीत समावेश झाला आहे. आता त्यांच्यात जागावाटप कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता वंचित बहुजन आघाडी सहा जागेंवर लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समजली आहे.

जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीची तिसरी बैठक आज मुंबईत पार पडली. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर आज पहिल्यांदाच वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे मविआच्या बैठकीला उपस्थित राहिले. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाने मविआला बळकटी मिळणार आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून मविआला अकोला, अमरावती, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी या पाच जागांचा प्रस्ताव दिला असून आणखी एक जागा (अद्याप निश्चिती नाही) यावर दावा केला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी या सहा जागांची मागणी केल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मित्रपक्ष या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘या’ जागांवर तिढा कायम
महाविकास आघाडीची ही पहिलीच एकत्रित निवडणूक आहे. ३४ जागेंवर एकमत झाले असून १४ जागांवर अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामध्ये वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि शिर्डी या जागांचा समावेश असल्याचे समजते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना…

व्यापार्‍यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यात शहरातील व्यापार्‍यांच्या...

मार्केटींगसाठी ठेवलेल्या मुलीवर अत्याचार; पती-पत्नी आरोपी, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मार्केटींगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) वारंवार शरीर संबंध...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान नगरला; आमदार संग्राम जगताप म्हणाले…

नियोजनाची बैठक | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर |...

धुक्यात नगर हरवले; नगर-सोलापूर रोडवर अपघात; मोठा अनर्थ टळला

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा अंमल संपून काही दिवस ढगाळ वातावरणाने नगर...