spot_img
अहमदनगरराजकीय व्यासपीठावर भाषण करणे पोलीस कर्मचार्‍याला भोवले, नेमकं प्रकरण काय?

राजकीय व्यासपीठावर भाषण करणे पोलीस कर्मचार्‍याला भोवले, नेमकं प्रकरण काय?

spot_img

श्रीगोंदा। नगर सहयाद्री-
राजकीय व्यासपीठावर जात भाषण केल्याच्या कारणातून श्रीगोंदा तालुयातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यावर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच त्या कर्मचार्‍याची खातेनिहाय चौकशीचे आदेश काढले असल्याची माहिती समजली आहे. भाऊसाहेब शिंदे असे या पोलीस कर्मचार्‍याचे नाव असून तो बेलवंडी पोलिस ठाण्यात चालक पदावर कार्यरत आहे.

अधिक माहिती अशी : बेलवंडी पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असणार्‍या भाऊसाहेब शिंदे या पोलिस कर्मचार्‍याने तालुयातील एका गावात राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर जाऊन भाषण करत त्या राजकीय पुढर्‍याला मदत करण्याचे आश्वासन दिले.

या भाषणाची व्हिडिओ लिप काही जणांनी काढून तो व्हिडिओ पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना देत संबंधित कर्मचार्‍यावर कारवाई करण्याची मागणी केली. घटनेची पोलीस अधीक्षकांनी तत्काळ दखल घेत या प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर पोलिस कर्मचारी भाऊसाहेब शिंदे यांना निलंबित केले. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ईश्वरी तुपे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

  अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक...

शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य मोठे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

निघोज / नगर सह्याद्री : कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य...

दगाफटका केल्यास सरकारचा कार्यक्रमच लावणार; जरांगे पाटील काय म्हणाले पहा…

बीड / नगर सह्याद्री - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच...

शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ५० लाखांची ऑनलाईन फसवणूक

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून...