spot_img
अहमदनगरवय ३५ भयंकर गुन्हे २३! स्थानिक गुन्हे शाखेकडून 'ते' तिघे अखेर जेरबंद

वय ३५ भयंकर गुन्हे २३! स्थानिक गुन्हे शाखेकडून ‘ते’ तिघे अखेर जेरबंद

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
चैन स्नॅचिंग प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून ८१ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. सिताराम ऊर्फ शितल ऊर्फ गणेश भानुदास कुर्‍हाडे, राहुल अनिल कुर्‍हाडे, सचिन मधुकर कुर्‍हाडे (तिघेही रा.चितळी स्टेशन, ता.राहाता) अशी आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी : सुवर्णा शाम मिसाळ (वय ४५, रा.सोनार गल्ली, लोणी बु.ता.राहाता) या रस्त्याने पायी घरी जाताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र ओढून नेले होते. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चैन स्नॅचिंगच्या घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हेचे पथक नेमून चैन स्नॅचिंगचे गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, अंमलदार दत्तात्रय हिंगडे, रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी, संदीप पवार, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, भिमराज खर्से, फुरकान शेख, अमृत आढाव व मेघराज कोल्हे आदींचे पथक नेमून कार्यवाही सुरु केली. पोलीस तपास करत असताना मोटार सायकलवरील इसमापैकी एक संशयीत इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार सिताराम ऊर्फ शितल ऊर्फ गणेश भानुदास कु-हाडे असल्याचे निष्पन्न झाले.

त्यावर अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दरोडा, घरफोडी चोरी व इतर कलमान्वये एकुण २३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पथकाने त्यास चितळी येथे जात ताब्यात घेतले. त्याने वरील दोन आरोपींच्या साहाय्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून ८१ ग्रॅम सोने हस्तगत केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजपच्या ‘बड्या’ नेत्याच्या सभेत राडा! कुठे घडाला प्रकार?

नांदेड | नगर सह्याद्री काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मराठा समजााच्या...

रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? शरद पवार नेमकं म्हणाले काय, पहा..

बारामती | नगर सह्याद्री वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत राम मंदिरात...

‘नगरकरांचे घर टू घर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन होणार’

अहमदनगर | नगर सह्याद्री- शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुमारे १.४० लाख...

जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार विखेंची प्रचार सभेत मोठी ग्वाही, वाचा सविस्तर…

अहमदनगर | नगर सह्याद्री मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपुर निधी मिळाला...