spot_img
अहमदनगरअहमदनगर:..तर 'तो' अवमान खपवून घेणार नाही! काँग्रेसची भाजपवर सडकून टीका, वाचा सविस्तर

अहमदनगर:..तर ‘तो’ अवमान खपवून घेणार नाही! काँग्रेसची भाजपवर सडकून टीका, वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
बाजारपेठेतील रस्त्याचे काम सुरू असताना बॅरीकेटिंगसाठी प्रभू श्रीरामांची प्रतिमा असणारा फ्लेस उलटा लावण्यात आला होता. त्यावरून बुधवारी रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटना समोर येताच तात्काळ तो फ्लेस हटविण्यात आला. मात्र यावरून काँग्रेसने आक्रमक होत फ्लेस लावणार्‍या भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. प्रभू श्रीरामांचा अवमान काँग्रेस कदापि खपवून घेणार नसल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.

काळे म्हणाले की, त्या फ्लेसवर पंतप्रधान, भाजपचे खासदारकीचे उमेदवार यांच्यासह भाजप नेत्यांचे देखील फोटो आहेत. तो फलक भाजपच्या कार्यकर्त्याने लावला होता. मुळात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असताना आधीच तो फ्लेस भाजपने काढून घेणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही.

त्यातच त्या ठिकाणी काम करणार्‍या रस्त्याच्या ठेकेदाराने देखील चुकीचे कृत्य केले आहे. प्रभू श्रीराम हे तमाम हिंदूंसाठी आस्थेचा विषय आहेत. अशा पद्धतीने जर त्यांच्या प्रतिमेची विटंबना होणार असेल तर काँग्रेस ती कदापी खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि आचारसंहिता कक्षाने यावरती संबंधित दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे काळे म्हणाले.

भाजपवर कारवाई करावी 
हर घर मोदी, घर घर मोदी असे घोषवाय लिहीत भाजपचे निवडणूक चिन्ह असणारे कमळ शहरातल्या सरकारी तसेच अनेक खाजगी मालकांच्या भिंतींवर रेखाटण्यात आले आहे. त्या संदर्भात नागरिकांनी आचारसंहिता कक्षाकडे तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने संबंधित घरांच्या घर मालकांना तंबी दिली आहे. घर मालकांनी स्वतःहून सदर भिंती स्वच्छ कराव्यात अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. यात त्या खाजगी मालकांचा काय दोष ? त्यांच्या घरांच्या भिंती रंगवण्याचे काम भाजपने केले आहे. कारवाई करावी. मात्र ती भाजपवर करावी. सर्वसामान्य नगरकरांना प्रशासनाने विनाकारण त्रास दिला, त्यांची पिळवणूक केली तर काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा किरण काळे यांनी प्रशासनाला दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादीचे राजेंद्र फाळके यांचा भाऊ- पुतण्यासह नरेंद्र फिरोदिया व प्रतिष्ठीतांवर फसवणूक, ऍट्रासीटीचा गुन्हा

आदिवासी समाजाची जमिन फसवणूक खरेदी करणे व विक्री करणे भोवले अहमदनगर | नगर सह्याद्री आदिवासी भिल्ल...

शरद पवार शुक्रवारी नगरमध्ये; लंके यांच्या संवाद यात्रेचा समारोप; ‘या’ दिवशी नीलेश लंके अर्ज दाखल करणार!

अहमदनगर | नगर सह्याद्री महाविकास आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या संवाद यात्रेचा...

आमदार निलेश लंकेंसाठी फाळके-कळमकर यांची केमिस्ट्री!; थोरातांचेही बळ! लंके प्रतिष्ठानची स्वतंत्र यंत्रणा निर्णायक…

मतदारसंघात प्रतिष्ठानचे आतापासूनच स्वतंत्र अस्तित्व | संवाद यात्रा निर्णायक टप्प्यावर! सारीपाट / शिवाजी शिर्के लोकसभा निवडणुकीसाठी...

जिल्हा बँकेचा ‘त्या’ शेतकऱयांना दिलासा! घेतला मोठा निर्णय, ‘ते’ व्याज २२ एप्रिलपर्यंत जमा करणार

माजी मंत्री, चेअरमन शिवाजी कर्डीले यांची माहिती अहमदनगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा...