spot_img
ब्रेकिंगपारनेर: ..हा तर बेकायदेशीर लिलाव? नगरपंचायतीचा 'असा' कारभार

पारनेर: ..हा तर बेकायदेशीर लिलाव? नगरपंचायतीचा ‘असा’ कारभार

spot_img

शरद झावरे । नगर सहयाद्री-

दरवर्षी दिवाळी निमित्त पारनेरमध्ये लोणी रोडवरील शासकीय जागेवर फटाका बाजार उभारला जातो. परंतु यावर्षी पारनेर नगरपंचायतीने या गाळ्यांचा लिलाव करून लाखो रुपयांची कमाई केली. त्यामुळे पारनेर शहरासह परिसरातील फटका व्यापार्‍यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप आहे. हा लिलाव बेकायदेशीर असल्याचा आरोप होत आहे.

पारनेर शहरातील गट नंबर १३ मध्ये दरवर्षी फटाका बाजार उभारण्यासाठी दहा १० बाय १० गाळे तीन हजार रुपये भरून आठ दिवसांसाठी भाडेतत्त्वावर दिले जात होते. परंतु यावर्षी या २२ गाळ्यांचा लिलाव पारनेर नगरपंचायतीने केला असून ४० हजारांपासून ते ४ हजारपर्यंत या २२ गाळ्यांचा लिलाव गुरुवारी करण्यात आला.

पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत हा लिलाव झाला. या लिलावाची चौकशी करण्याची मागणी फटाका व्यापार्‍यांनी केली आहे.

पारनेर-लोणी रोडवर असणार्‍या शासकीय जागा यासंदर्भात न्यायालयीन वाद चालू आहे. परंतु पारनेर नगरपंचायतीने फटाका बाजारच्या नावखाली लाखो रुपयांची कमाई या लिलावातून केली. या संदर्भात कोणत्याही वर्तमानपत्रात माहिती दिली नाही अथवा सूचना फलक किंवा सोशल मीडियावर जाहिरात प्रसिद्ध केली नाही.

दुसरीकडे ज्या फटका व्यापार्‍यांनी जीएसटी बिले सादर केली, त्यांनाच फटाका बाजारमध्ये गाळे देण्यात आले आहे.अनेक होतकरू व गरजू मुले दिवाळीच्या काळात फटाका स्टॉल लावून शिक्षण व कुटुंबासाठी पैसे कमावतात. पारनेर नगर पंचायतीने बोली लिलाव करून या तरुणांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर ब्रेकिंग ! गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर हल्ला, माळीवाड्यात पोलिसांचा फौजफाटा

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगरच्या बालिकाश्रम रोड परिसरात काही दिवसांपूर्वी ओंकार उर्फ...

Ahmednagar: शहरासह जिल्ह्यात जोर ‘धार’

रस्त्यांवर अर्धाफुट पाणी; नगरकरांची अक्षरश: त्रेधातिरपीट अहमदनगर | नगर सह्याद्री मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत...

Ahmednagar: पत्र आले आमदारांचे, ‘माफी’ सूचली प्रशासनाला

शास्तीच्या रकमेत सवलत देण्याची परंपरा कायम ः आता प्रतिसादाकडे लक्ष अहमदनगर | नगर सह्याद्री आमदारांनी पत्र...

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...